पहिल्या भागात आपण एक प्रोग्रॅम करून पाहिला. मात्र त्यात आपण लिहिलेलेच वाक्य दाखविण्याचे कार्य होते. अधिक वाक्ये लिहिल्यास ती एकापुढे एक अशी सलग येतात. वेगवेगळ्या ओळीवर येण्यासाठी वाक्याशेवटी \n (म्हणजे न्यू लाईन) चा वापर करावा लागतो.
बीजगणितात आपण चल व अचल संख्यांना नावे देऊन गणित सोडवितो, त्याप्रमाणे c प्रोग्रॅममध्येही आपल्याला संख्या ( number) वा अक्षरसमूह (string) यांना नावे देऊन गणिते सोडविता येतात. पूर्णांक संख्येसाठी int तर अपुर्णांकासाठी float यांचा वापर केला जातो. उदा.
int width,height,area,perimeter
याचा अर्थ वरील सर्व संख्या पूर्णांकात आहेत.
तर
float x,y याचा अर्थ x आणि y या अपूर्णांकातील ( दशांश चिन्हासहित) संख्या आहेत.
स्कीनवर पूर्णांक दाखविण्यासाठी %d तर अपुर्णांक दाखविण्यासाठी %f ही चिन्हे वापरावी लागतात व शेवटी व्हेरिएबलचे नाव लिहावे लागते.
आता वरील माहितीचा उपयोग करून तयार केलेला खालील प्रोग्रॅम लिहून उत्तर काढा.
#include
void main()
{
int width,height,area,perimeter;
width=20;
height=30;
area=width*height;
perimeter= 2*(width+height);
printf( "A rectangle has width of %d and height of %d \n",width,height);
printf("Calculate its ara and perimeter.\n");
printf("Area of rectangle = %d \n", area);
printf("Perimeter of rectangle = %d \n",perimeter);
}
याचे उत्तर खालीलप्रमाणे येईल.
A rectangle has width of 20 and height of 30
Calculate its ara and perimeter.
Area of rectangle = 600
Perimeter of rectangle = 100