Saturday, March 5, 2011

FTP साठी FileZilla (फाईलझिला)चा वापर

वेबसाईट डिझाईन केल्यानंतर ती सर्व्हरवर ठेवावी लागते. यालाच होस्टींग असे म्हणतात. होस्टींग सर्व्हिसेस देणार्‍या ISP ( इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर) संस्थेच्या कॉम्प्युटरवर ती ठेवली जाते. अशा दूरस्थ (रिमोट) सर्व्हरकडे वेबसाईटची पेजेस पाठविण्यासाठी फाईल ट्रॅन्स्फर प्रोटोकॉल (FTP) चा वापर करावा लागतो. उदा. ब्राउजरच्या अड्रेसबारमध्ये खालीलप्रमाणे वेबसाईटचा पत्ता लिहावा लागतो.
ftp://www.dnyandeep.net

युजरचे नाव व पासवर्ड घातल्यावर सर्व्हरवरील वेबसाईटचे फोल्डर उघडते. व त्यातल्या फाईल व फोल्डर्स दिसतात.


मग साध्या कॉपी (Copy) व पेस्ट( Paste) टूल्सचा वापर करून आपल्याला फाईल डाउनलोड वा अपलोड करता येतात. मात्र ही सुविधा ब्राउजरच्या प्रकारावर व क्षमतेवर अवलंबून असते. यावर उपाय म्हणून बहुधा सर्व्हरवर फाईल डाउनलोड वा अपलोड करण्यासाठी cpanel ( Control panel) नावाचा विशेष प्रोग्रॅम वापरला जातो. त्यात रिमोट सर्व्हरवरील फाईल्सचे व्यवस्थापन करण्यासाठी अनेक सुविधा असतात.

आपल्याला सर्व्हरवर फाईल पाठविण्यासाठी वा तेथील फाईल आपल्या कॉम्प्युटरवर घेण्यासाठी FileZilla ( फाईलझिला) हा प्रोग्रॅम वापरता येतो.खाली त्याचा मेनू पहा.

याच्या मेनूमध्ये वरच्या पट्टीतील File वा दुसर्‍या पट्टीतील पहिल्या कॉम्प्युटरच्या चित्रावर क्लिक केले की साईटमेनू मॅनेजरचे पान उघडते.शेजारच्या बाणावर क्लिक केल्यास सर्व वेबसाईट्सची यादी मिळते व त्यावरील विशिष्ट वेबसाईट निवडली की साईट मॅनेजरचे पान उघडते.

यात उजव्या बाजूच्या टेबलमध्ये General (जनरल) टॅबमध्ये होस्ट सर्व्हरचा IP Address (बहुधा वेबसाईटचे नाव), खाली logon मध्ये Normal सिलेक्ट करून युजरचे नाव व FTP पासवर्ड लिहिला की व OK बटनवर क्लिक करावे. तसेच Advanced (अड्व्हान्सड) टॅबमध्ये वेबसाईटचा स्थानिक पता व रिमोट सर्व्हरवरील योग्य फोल्डरचा पत्ता टाईप करावा. आता Connect या बटनावर क्लिक केले की खालच्या दोन रकान्यात डावीकडे स्थानिक फोल्डर तर उजवीकडे रिमोट सर्व्हरवरील वेबसाईटचे फोल्डर उघडते.

आता डावीकडील स्थानिक वेबसाईटच्या फोल्डरंमधील फाईलवर डबलक्लिक केले की ती फाईल रिमोट सर्व्हरवर अपलोड होते. त्याचप्रमाणे उजवीकडील फाईलवर डबलक्लिक केले की ती फाईल स्थानिक फोल्डरमध्ये डाउनलोड होते. मधल्या भागात अपलोड वा डाउनलोडचे कार्य पहाता येते. तर खाली किती फाईलचे काम शिल्लक आहे हे दर्शविले जाते. एकावेळी अनेक फाईल सिलेक्ट करून अपलोड वा डाउनलोड करता येतात.

अशाप्रकारे वेबसाईटच्या सर्व फाईल्स व फोल्डर्स रिमोट सर्व्हरवर अपलोड केले की ब्राउजरमध्ये वेबसाईटचा पत्ता देऊन वेबसाईट पहाता येते.

No comments:

Post a Comment