Friday, March 4, 2011

ड्रीमव्हीवरच्या साहाय्याने वेबपेज डिझाईन. भाग - ३

वेबपेजमध्ये टेबल घालायचे असल्यास वरच्या पट्टीतील इन्सर्ट सुविधा वापरून ते घालता येते. टेबलची रुंदी, उंची, किती ओळी (tr) व कितॊ रकाने (td),पॅडींग इत्यादी सर्व माहिती टेबल सिलेक्ट करून येणार्‍या टेबलच्या प्रॉपर्टीज विंडोमध्ये भरता येतात. मेन डिझाईन विंडो व खालील प्रॉपर्टी विंडो यांच्या मधल्या पट्टीत सिलेक्ट केलेला टॅग दिसतो. त्यावर क्लिक करून देखील हवी ती प्रॉपर्टी विंडो उघडता येते.
त्याच प्रमाणे टेबलमध्ये मजकूर लिहिता येतो. याचे कोड (html program ) आपोआप तयार होतो. खालील उदाहरण पहा.

याच पद्धतीने सर्व आवश्यक घटक घालून ड्रीमव्हीवरच्या साहाय्याने वेबपेज डिझाईन करता येते. ते ब्राउजरमध्ये टेस्ट करून बघता येते.

ड्रीमव्हीवरच्या साईट व्यवस्थापन सुविधेचा उपयोग करून वेबसाईट सर्व्हरवर अपलोद करणे वा त्यात बदल करणे वा सर्व्हरवरील वेबपेजेस डाउनलोड करणे इत्यादी गोष्टी करता येतात.

ड्रीमव्हीवरमध्ये सीएसएस स्टाईलशीट ही तयार करता येतो व तो वेबपेजला जोडता येतो. (Apply Stylesheet)

एकंदरित पाहता ड्रीमव्हीवरच्या वापराने वेबडिझाईनचे काम सोपे होते.

No comments:

Post a Comment