Thursday, January 17, 2013

c प्रोग्रॅमिंग, भाग-१

ज्ञानदीप फौंडेशनने वेब डिझाईनचे प्रशिक्षण वर्ग सुरू केल्यावर आता आमच्या लक्षात आले आहे की वेबडिझाईनपेक्षाही सर्वप्रथम  c व c++  या दोन भाषांना  विद्यार्थ्यांची सर्वात जास्त मागणी आहे.

कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंग शिकायचे म्हटले की सर्वप्रथम c प्रोग्रॅमिंग आले पाहिजे. कोणतीही गोष्ट मातृभाषेतून लवकर समजते त्यामुळे  मराठीत  c प्रोग्रॅमिंगविषयी लेख लिहिण्यास सुरुवात करीत आहे.सर्व प्रथम आठवण झाली ती Let us C  या पुस्तकाची. C बरोबर माझी पहिली ओळख झाली ती या पुस्तकानेच. त्याचे c   या अक्षराच्या उच्चारातून ध्वनित होणार्‍या दुसर्‍या अर्थावर आधारलेले शीर्षकच आकर्षक होते.  ‘चला पाहू या’ या नावाने ब्लॉग लिहूनच मीही c प्रोग्रॅमिंग विषयी लेखनास सुरुवात करावी असा मला मोह झाला. पण मी तो आवरला.

सर्वजण आधी c प्रोग्रॅमिंग शिकतात. माझ्याबाबतीत मात्र तसे घडले नाही. आधी मी बेसिक (gwbasic) प्रोग्रॅमिंग भाषा शिकलो. ती मला इतकी सोपी वाटली की थोड्याच अवधीत मला बेसिकमध्ये कोणताही प्रोग्रॅम लिहिणे जमू लागले. मात्र असे प्रोग्रॅम चालवून त्याचे उत्तर काढण्यासाठी gwbasic ची गरज भासे. शिवाय ती interpreter पद्धतीने ( प्रत्येक वाक्यागणिक प्रक्रिया करणारी) कार्य करीत असल्याने त्या भाषेला कॉम्प्युटर प्रोग्रॅमरऎवजी वापर करणार्‍यासाठी ती योग्य होती.

त्यामानाने c  प्रोग्रॅमिंग भाषा अधिक कार्यक्षम, प्रमाणबद्ध व  कॉम्प्युटर हार्डवेअर संचलनात अधिक सक्षम व मशिन कोडशी निगडित असल्याने या भाषेस महत्वाचे स्थान आहे. ती शिकण्याचे मी ठरविले. बेसिकच्या मानाने मला c फार क्लिष्ट व समजायला अवघड वाटत होती.

त्याच काळात माझ्या वाचनात  यशवंत कानेटकर यांचे Let us C  या नावाचे पुस्तक आले. त्या पुस्तकाने माझी C  प्रोग्रॅमिंग भाषेबद्दलची भीती दूर झाली व मला त्यातही प्रोग्रॅम करता येऊ लागले. यशवंत कानेटकर यांची Exploring C व Understanding pointers in C ही पुस्तके मी वाचली. आता गुगलवर या नावाचा शोध घेतल्यावर मला समजले की Let us C Solutions नावाच्या पुस्तकाची १० वी आवृत्ती २०१० मध्ये प्रसिद्ध झाली आहे. म्हणजे अजूनही त्या पुस्तकाची लोकप्रियता टिकून आहे असे दिसते.

c प्रोग्रॅमिंग शिकविण्यासाठी सर्वप्रथम अडचण आली ती ही की windows xp किंवा windows 7  असणार्‍या कॉम्प्युटरवर c प्रोग्रॅमिंग कसे करायचे? सुदैवाने Turbo C++ compiler डाउनलोड करून  व www.dosbox.com या वेबपेजवर दिलेल्या dosboxचा उपयोग करून आपल्याला  c व c++  प्रोग्रॅम लिहून त्याची उत्तरे पाहता येतात.

Turbo C++ compiler डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकचा वापर करावा.
http://setha.info/ict-turbocpp/5-ict-turbocpp-0001.html
त्यात खालील तीन प्रोग्रॅम डाउनलोड करण्यासाठी दिले आहेत.
 Download Turbo C++ Software (Three files)
File 1: Tc.exe Download
File 2: Tc.r00 Download
File 3: Tc.r01 Download
Install Turbo C++ Software

TurboC++  इन्स्टॉल करण्यासाठी  tc.exe या प्रोग्रॅमवर क्लिक करावे. मग खालील स्क्रीन दिसतो. dosboxचा उपयोग केल्यास आपल्याला पूर्ण स्क्रीन वापरता येतो.



माउसचा वापर करून File  मेनू उघडा व त्यातील  New हा पर्याय निवडा. आता खालील प्रोग्रॅम टाईप करा व तो File  मेनू वापरून lesson1.c या नावाने save करा.

#include
void main()
{
printf("Lesson 1 - Welcome to C Programming");
}

माउसचा वापर करून Compile मेनू उघडा व त्यातील Compile  हा पर्याय निवडा.
success  असा संदेश दिसल्यास आपला प्रोग्रॅम बरोबर असून योग्य प्रकारे compile  झाल्याचे समजते.
प्रोग्रॅम लिंक करण्यासाठी control+F9  या की दाबा.
आता उत्तर पाहण्यासाठी alt+F5 या की दाबा. आपणास उत्तर् म्हणून स्क्रीनवर 
Lesson 1 - Welcome to C Programming
हे वाक्य दिसेल.

आपण एक प्रोग्रॅम करून पाहिला. मात्र त्यातील संज्ञांचा अर्थ तेथे दिला नव्हता. c  ही सर्वात खालच्या पातळीवरील भाषा असल्याने त्यात कॉम्प्युटरच्या हार्डवेअरशी संबंधित आज्ञांचा वापर करावा लागतो.
#include   या पहिल्या वाक्यातील stdio म्हणजे स्टॅंडर्ड इनपुट-आऊटपुट आणि h म्हणजे हेडर. c प्रोग्रॅममधील आज्ञा हार्डवेअरला  समजण्यासाठी (इनपुट) व त्याप्रमाणे कृती दाखविण्यासाठी (आऊटपुट) यांची माहिती देणारी हेडर फाईल c प्रोग्रॅमच्या सुरुवातीसच त्यात समाविष्ट (#include) करावी लागते.

void main()  या दुसर्‍या वाक्यातील main() चा अर्थ मुख्य प्रोग्रॅमचा संच. void म्हणजे या प्रोग्रॅममधून कोणतीही माहिती नव्याने तयार होत नाही.

main() या संचाची सुरुवात {  व शेवट } या महिरपी कंसांनी होतो.

 या कंसात असणारी  printf(); आज्ञा म्हणजे कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर कोटेशनमधील वाक्य Lesson 1 - Welcome to C Programming दाखविण्याचा निर्देश.
main() च्या संचात एकापाठोपाठ एक अशा printf(); आज्ञा देऊन तुम्हाला हवी ती माहिती स्क्रीनवर दाखविण्याचा प्रोग्रॅम लिहिता येईल.






2 comments:

  1. namskar sir mala c languge badal blog awdla sir me turbo c ++ instal keli ahi tume dilela program tayep karun compail kela parantu erroe eti ahy please help me in marathi may email:- mondheprakash@yahoo.com

    ReplyDelete
  2. I know this if off topic but I'm looking into starting my own blog and was curious what all is
    needed to get set up? I'm assuming having a blog like yours would cost a pretty penny?

    I'm not very internet savvy so I'm not 100% sure.
    Any tips or advice would be greatly appreciated. Thank you

    ReplyDelete