आज दिनांक 18 जानेवारी 2025 रोजी ज्ञानदीप फौंडेशनला वालचंद कॉलेजमधील इलेक्ट्रॉनिक्स विभागात अनेक वर्षे काम करण्याचा अनुभव असणारे आणि सांगलीतील मराठी विज्ञान परिषदेचे प्रायोजक श्री. सुनील देशपांडे यांनी भेट दिली व त्यानी प्रकाशित केलेल्या इलेक्ट्रॉनिक्स आणि अर्ड्युनो आधारित सर्कीटविषयी सर्व माहिती असणा-या 'निर्मितीकडून नवनिर्मितीकडे'या पुस्तकाविषयी अटल ज्ञानदीप प्रशिक्षण वर्गात त्यांनी माहिती सांगितली.
ज्ञानदीपचे डॉ. सु. वि. रानडे यांनी त्यांचे अभिनंदन करून या पुस्तकाच्या पाच प्रती ज्ञानदीप साठी विकत घेतल्या तसेच विलिंग्डल कॉलेजचे माजी प्राध्यापक डॉ. यशवंत तोरो यांचे हस्ते या पुस्तकाचे उद्घाटन करण्यात आले.
फोटो - ज्ञानदीपच्या अटल ज्ञानदीप प्रशिक्षण वर्गातील सौ. मुग्धा कानिटकर, प्रा. कानिटकर, श्री. सुनील देशपांडे, डॉ. यशवंत तोरो आणि डॉ. सु. वि. रानडे.
यावेळी रेकॉर्ड करण्यात आलेला व्हिडीओ नंतर प्रसिद्ध करण्यात येईल.
श्री. सुनील देशपांडे यांनी यावेळी इलेक्ट्रॉनिक सर्किटचे पाण्याच्या प्रवाहाशी असणारे साधर्म्य उपस्थितांना समजावून सांगितले. तसेच ब्रेडबोर्ड, त्यावरील कांम्पोनंटची जोडणी तसेच अर्ड्युनोची रचना यावर मार्गदर्शन केले.
यापुढे ज्ञानदीपच्या अटल ज्ञानदीप प्रशिक्षण योजनेत ते सहभागी होणार असून विद्यार्थ्यांना सर्व ते मार्गदर्शन करणार आहेत.