Wednesday, September 18, 2019

Linking the present with past for better future

Last weekend, we had gone to see Burney Falls in eastern Shasta County, Northern California. It was a marvelous scene where the water was gushing down in two main streams from a height of 129 feet in valley which carried the ice cold water. The falling water was creating a inverted shower of water droplets rising up through valley.

 President Teddy Roosevelt once called it the ‘Eighth Wonder of the World’.

I sat there looking at the falling water and listening to constant roaring sound.  As my mind was lingering with fresh memories of my association with Walchand College and problems in linking past and present students, it seemed to me that the falls is nothing nut educational institute showing  the connection between past, present and future. The water at top if we consider as past students with high potential  as regards knowledge and experience but remaining static, the falling water as present students full with active energy and the downstream water representing their uncertain future stumbling across many obstacles in the way.
 ]Oh! The comparison is not correct. In case of falls, the top water is the source of energy for falling water, This energy is sufficient for the water to create a steady stream of downflow. However, an educational institute is only interested in harnessing the energy of falling water. It doesn’t explore the assets of  past students or does not create a channel for smooth flow in future career.
The solution to this situation was also provided by the falls. If the present students are made aware of the potential  energy source of past students, they can get guidance, support and avenues for deciding their future career. Thus linking present with past can ensure bright future in case of educational institute.

Since assuming joint secretary post of Association of Past Students, I was trying to find effective method to activate the association. I realize now that this can be done only by through present students as they are direct beneficiaries’ of strong and responsive association of past students and after graduation, they will be joining the same community.
What is true about Walchand College, is applicable to any college or school. Past students is the wealth  and new power created by institute and is a great contribution to society.  Of course to cash this treasure, the educational institutes should keep updated record of their past students, should help them till they get properly settled in their career and take special efforts to create ever lasting bonds between present and past students.   

Our visit to Burbey Falls gave me new outlook and created an upsurge of enthusiasm  in working for fulfilling aspirations of Walchand College students through strengthening APS.

Tuesday, September 17, 2019

लोकशाही, नेतेशाही की सरंजामशाही

भारत लोकशाहीप्रधान देश आहे हे आपण अभिमानाने सांगत असतो. लोकशाही म्हटले की जनतेतून लोकप्रतिनिधी निवडून त्यांच्या हाती सत्त्ता सोपविण्यासाठी निवडणूक आवश्यक ठरते. घटनेच्या चौकटीत राहून व उपलब्ध साधनसामुग्रीचा वापर करून देशाचा समग्र विकास व सर्व जनतेचे हित कसे साधता येईल याबाबत वैचारिक मतभेद असू शकतात. या वैचारिक पार्श्वभूमीच्या आधारे लोकांचे गट बनून राजकीय पक्ष तयार होतात. आपली वैचारिक भूमिका जनतेस पटवून देऊन बहुमत आपल्याकडे खेचून आणणार्‍या पक्षाकडे सत्ता सोपविली जाणे लोकशाहीत अपेक्षित असते.

निवडणूक आली की सर्व राजकीय पक्ष व नेतेमंडळी खडबडून जागी होतात. जनतेची सेवा करण्याची संधी आपल्याला मिळावी व ती विरोधी गटास मिळाली तर निष्काम सेवा न होता भ्रष्टाचार व जनतेची व राष्ट्रीय संपत्तीची लूट होईल अशी प्रत्येकाची मनोमन धारणा असते. त्यामुळॆ कोणत्याही परिस्थितीत निवडणूक जिंकणे व सत्तेवर येणे आवश्यक आहे अशी त्यांची धारणा बनते. मग त्यासाठी तत्वांशी तडजोड करायला लागली तरी चालेल अशी मानसिकता त्यातून निर्माण होते. परिणामी बहुमत एवढेच ध्येय उरते.

जनतेचे लक्ष आपल्याकडे वेधून घेण्यासाठी यात्रा, सभा, भेटी, आत्मक्लेश यासारखे अहिंकक मार्ग सोडून संप, बंद, लुटालूट, जाळपोळ इत्यादी विध्वंसक मार्गांचाही अवलंब केला जातो. साम. दाम, दंड, भेद या सर्व मार्गांचा उपयोग करून जनतेची मनधरणी सुरू होते. आश्वासनांच्या धुवाधार पावसात जनता चिंब चिंब भिजते. तिला हे कळत नाही की आतापर्यंत आपण या पक्षांच्या व नेत्यांच्या मागे आशाळभूतपणे धावत होतो आता यांना एवढे आपल्यावरील प्रेमाचे का भरते आले आहे? त्यांना उमजते की खरी सत्ता आपल्या हातात आहे आणि ती घेण्यासाठी नेत्यांच्यात चढाओढ सुरू आहे.

भारतात सध्या राजकीय विचारधारा नावालाच उरलेली आहे. सत्तेसाठी कोणत्याही पक्षाची युती करण्यात कोणत्याच पक्षाला काही गैर वाटत नाही. तिकीट नाही मिळाले तर विरोधी पक्षात जाणे आता नेत्यांनाच नव्हे तर जनतेलाही गैर वाटत नाही. जनता राजकीय पक्ष जाणत नाही. मग त्या पक्षाच्या विचारधारेशी नेत्याची बांधिलकी आहे की नाही हे तपासून पाहण्याचे कारणच पडत नाही. आपला स्वतःचा, आपल्य़ा गटाचा वा आपल्या परिसराच्या विकास करणार्‍या वा करण्याचे आश्वासन देणार्‍या नेत्याच्या मागे लोक उभे राहतात.

पक्षापेक्षा नेते आपल्या पाठिराख्यांचा गट तयार करतात. या गटातील लोकांना पक्षशिस्त नव्हे तर व्यक्तीनिष्ठा महत्वाची वाटते.आपली सद्‌सद्‌ विवेकबुद्धी गहाण ठेवून नेत्याच्या हाती सत्ता एकवटतात. नेत्यांच्या विचाराप्रमाणे ते एका पक्षातून दुसर्‍या पक्षात केवळा जातात एवढेच नाही तर पूर्वीच्या पक्षातील लोकांचा द्वेष करतात.निवडणूक झाल्य़ानंतर दुसरे नाट्य सुरू होते. एकमेकांशी ईर्षेने भांडणारे नेते पुनः एक होतात, पक्ष बदलतात व शेवटी सत्ता हस्तगत करतात.

ही सत्ता मिळाल्यावर फक्त जनतेची सेवाच करायची त्यांना कसे जमणार. झालेला खर्च कसा वसूल होणार. आपल्या गटातील लोकांना ते काय बक्षिस देणार. मग भ्रष्टाचार अपरिहार्यच ठरतो. तसे म्हटले तर जनतेची सेवा करायला सत्ता कशाला पाहिजे. भ्रष्टाचारावर पूर्ण नियंत्रण येऊन तो करणे अशक्य झाले तर निवडणूक कशासाठी लढवायची? फुकटच्या लष्कराच्या भाकरी कोण भाजेल?

सध्याची प्रसारमाध्यमे पक्षाच्या ध्येयधोरणावर चर्चा न करता नेत्यांच्या बोलण्याला जास्त महत्व देते. सिनेनट, खेळाडू तसेच हे नेते प्रसारमाध्यमांना जनतेला आकृष्ट करण्याचे हुकुमी साधन वाटतात. म्हणजे आपण अजूनही व्यक्तीला विचारसरणीपेक्षा जास्त मान देतो.

हे सर्व पाहिले की पूर्वीच्या सरंजामशाहीची आठवण होते. आपण अजूनही खर्‍या लोकशाहीचा स्वीकार केला नाही व लोकशाहीचा खरा अर्थ समजावून घेतला नाही असे मला वाटते. जनता याबाबतीत प्रशिक्षित करणे आवश्यक आहे. लेखक, प्रसारमाध्यमे, विचारवंत यांनी याबाबतीत पुढाकार घ्यावयास हवा. उपोषणासारखे अहिंसक पण अतिरेकी मार्ग लोकशाहीत कितपत योग्य आहेत याचाही विचार व्हावयास हवा.

भ्रष्टाचार खरेच संपला तर स्वार्थी नेते निवडणूक लढायलाच तयार होणार नाहीत. मग अहिंसा,लोकशाही व समाजवादावर दृढ श्रद्धा असणार्‍या ज्ञानी व दृष्ट्या व्यक्तींना शोधून त्यांच्यावर जबरदस्तीने नेतृत्व करायची जबाबदारी सोपवावी लागेल. भ्रष्टाचाराची कीड त्यांना लागू नये म्हणून त्यासाठी त्यांच्यावर जनतेचा अंकुश (लोकपाल) ठेवावा लागेल. एखाद्या मोठ्या उद्योगाचे व्यवस्थापन करणार्‍या अधिकार्‍याप्रमाणे त्यांना चांगले मानधन द्यावे लागेल. असे झाले तर लोकशाहीचे खरे रूप लोकांना पहायला मिळेल.

राजकीय पक्षांनी आपल्या पक्षाची ध्येय धोरणे अधिक स्पष्ट व सुनिश्चित करणे आवश्यक आहे. कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रीय संपत्तीचा नाश, हिसाचार वा अत्यावश्यक सेवांत खंड न करण्याचे बंधन त्यांनी प्रकटपणे जाहीर करावयास हवे व पक्षशिस्तीच्या वा ध्येयधोरणाविरुद्ध वागणार्‍या कोणाही सदस्यास पक्षातून काढून टाकले पाहिजे. तत्वशून्य युती वा आघाडीमुळे त्या पक्षाचे व लोकशाहीचेही नुकसानच होते हे त्यांनी ध्यानात घेतले पाहिजे.


असे झाले नाही तर लोकशाहीचे सध्याचे नेतेशाहीचे, झुंडशाहीचे व सरंजामशाहीचे स्वरूप कायम राहील व राष्ट्रीय विकासात तो मोठा अडसर ठरेल.