Sunday, July 3, 2016

मराठी अक्षरांतील जातीभेद व नातीगोती

मराठी अक्षरांच्या रचनेनुसार वर्गीकरण करण्यास मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा मला जाणवले की आपण केलेले गट अगदीच ढोबळ स्वरुपाचे आहेत.
अक्षरातील उभ्या आडव्या रेषा, त्यातील वळणे, गाठी आणि कडी यांचा विचार केला तर त्यांच्या वेगवेगळ्या जाती करता येतील तसेच बाराखडीतील नातेसंबंधांचा शोध घेता येईल.

अक्षरांच्या अशा वैविध्यपूर्ण रचनांचा उपयोग करून  चित्रे व आकृत्यांच्या साहाय्याने  अनेक मनोरंजक खेळ तयार करता येतील.


बाराखडीतील अक्षरांचे वर्गीकरण
शेपटी असणारी अक्षरे- ु ू ृ
वेणी असणारी अक्षरे - ि ी
शेंडी असणारी अक्षरे- ई
एक शिंगी अक्षरे- े ओ ो
दोन शिंगी अक्षरे - ै ौ
 व्यंजनांचे आकारानुसार  वर्गीकरण
उभी रेघ असणारी अक्षरे  - (काठी वा दंडधारी)  - अ क ख ग घ ण त थ ध न प फ ब भ म य ल व श स क्ष ष
गोल कडी असणारी अक्षरे - क व ख ब ळ ठ
दोन कडी असणारी अक्षरे - ळ क
गाठ  असणारी अक्षरे (आतल्या गाठीची) - म न र ध थ छ
देठ असणारी अक्षरे - द ट ड
बलाढ्य  अक्षरे- झ क्ष ज्ञ
सडपातळ अक्षरे - र उ
जोड अक्षरे - ख
एक वळण असणारी ( वळणदार) अक्षरे- ट द ढ च ज य स र त
दोन वळणे असणारी अक्षरे - ड इ ई घ ध ल

बाराखडीतील (उच्चाराप्रमाणे) नाते संबंध
क चा थोरला भाऊ का
क ची छोटी बहीण - कि
क ची मोठी  बहीण - की
क चा छोटा भाऊ - कु
क चा मोठा भाउ - कू
क चा काका - के
क ची काकू - कै
क चे बाबा - को
क ची आई - कौ
क चे आजोबा - कं
क ची आजी - क:
कुटुंब.
क च्या  घरातले हे सारे नातेवाईक मिळून बनते क चे कुटुंब.
राजघराणे
अ चे असे कुटुंब म्हणजे राजघराणे
अक्षर शहर
क पासून ते ज्ञ पर्यंत अशी सर्व कुटुंबे अक्षर शहरात राहतात.
जोडाक्षर शह
दोन अक्षरांचे लग्न झाले की नवे जोडाक्षर तयार होते.
 जसे स + व = स्व
अशा जोडाक्षरांचीही कुटुंबे असतात. ती जोडाक्षर शहरात राहतात.
शब्द
या दोन्ही शहरातील लोक एकत्र येऊन शब्द तयार होतात.
शब्दांच्या जाती व नाते संबंध यावर पूर्वी पासून बरेच संशोधन होऊन त्याची माहिती आपण मराठी व्याकरणात शिकतोच.

मराठी अक्षरांची नवी ओळख


मराठी वर्णमाला ही उच्चारानुसार रचलेली आहे, मात्र मराठी अक्षरे तयार होताना त्यात रेखीव संगती आढळत नाही.
साहजिकच मराठी भाषा शिकणार्‍या मुलांना मराठी अक्षरे लक्षात ठेवण्यासाठी बरेच प्रयास करावे लागतात. अक्षरांच्या रचनेतील समानता पाहून त्यांची फेरमांडणी केली तर मराठी अक्षरे ओळखणे, लक्षात ठेवणे व लिहिता येणे सुलभ होऊ शकते.
स्वर -
अक्षरांच्या रचनेनुसार स्वरांच्या खालीलप्रमाणे जोड्या करता येतील.
अ आ
इ ई
उ ऊ
ए ऐ
ओ औ
अं अ:
वरील जोड्यांमध्ये पहिल्या अक्षरांच्या उच्चार र्‍ह्स्व तर दुसर्‍या अक्षरांच्या उच्चार दीर्घ आहे.
व्यंजने -
गमभन ही चार अक्षरे रचनेच्या दृष्टीने समान आहेत.
याचं पद्धतीनेच बाकी सर्व अक्षरांचेही खालीलप्रमाणे गट पाडतां येतील.
व ब क ख
प फ ष
र स ख श
ट ठ द
ड इ ई ह
त ल न
य थ
च ज हे एकमेकाविरुद्ध आधाराचे आहेत
घ ध छ
बाराखडी-
स्वरांप्रमाणे व्यंजनांच्याही उच्चाराप्रमाणे जोड्या करता येतील.
क का
कि की
कु कू
के कै
को कौ
कं क:
याचप्रकारे सर्व व्यंजनांच्याही जोड्या करता येतील,
अक्षरे ओळखण्यासाठी साहाय्यभूत ठरणारे अनेक खेळ या कल्पनेतून विकसित करता येतील

Saturday, July 2, 2016

WaterCAD Software for Water Distribution Modeling and Management

WaterCAD - Software for Water Distribution Modeling and Management developed by Bentley

WaterCAD is an easy-to-use hydraulic and water quality modeling application for water distribution systems. Utilities, municipalities,and engineering fi rms trust WaterCAD as a reliable, resource-saving, decision-support tool for their water infrastructure.
Software Developers : For more info contact  Bentley at: www.bentley.com
The Bentley Student Ambassador program is designed to bridge the chasm between academic learning and industry by creating a global network of student ambassadors who will act as a link between Bentley Systems and their campus. This network will allow students of institutions across the world to interact with each other and exchange ideas and notes on the use of engineering software. 
Visit - http://apps.bentley.com/studentserver/home/index for student server access.
Read the book preview about WaterCAD software

 AWDM free preview.pdf