Thursday, August 7, 2014

गीता अध्याय १२ व १५ चे पाठांतर

लहानपणी आमच्या शाळेत गीतेचे १२ व १५ व्या अध्यायाच्या पाठांतराच्या स्पर्धा होत्या. त्यावेळी स्पर्धेच्या निमित्ताने आमच्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांनी हे अध्याय पाठ केले होते. त्यानंतर मी कधी हे अध्याय म्हटले नव्हते.

श्रृंगेरी येथील शंकराचारयांच्या मठातर्फे गीता पाठांतरास प्रोत्साहन म्हणून स्पर्धा घेतल्या जातात व तेथे आमचे व्याही श्री. काशीनाथ खरे यांनी  सर्व १८ अध्याय पाठांतर करून पारितोषिक मिळविले. हे समजल्यानंतर मला त्या पूर्वीच्या मी केलेल्या पाठांतराची आठवण झाली आणि आश्चर्य म्हणजे आज जवळजवळ ६० वर्षांनंतरही यातील सर्व श्लोक मला आठवता आले. म्हणजे लहानपणी जर असे पाठांतर केले तर त्याची स्मृती आयुष्यभर आपल्याला साथ देते हे मला जाणवले.

हा ब्लॉग वाचणार्‍या विद्यार्थ्यांनी असे पाठांतर करावे असे मला वाटते. त्यांच्या सोयीसाठी मी हे अध्याय ध्वनीफितींसह देत आहे.

गीता अध्याय १२ -
गीता अध्याय  १५ -

लहानपणी  पाठांतर लवकर करता येते. यामुळे संस्कृत श्लोक, पाढे, सुविचार एवढेच नव्हे तर पाठ्यक्रमातील कविता मुलांनी पाठ करून ठेवणे त्यांना पुढील आयुष्यात फार उपयोगी पडेल असे मला वाटते.

No comments:

Post a Comment