Tuesday, April 1, 2014

वैदिक गणित ( भाग पहिला : गुणाकार) सूत्र ७

सूत्र ७ - ‘ ऊर्ध्वतिर्यग्भ्याम्‌ ’
अर्थ - सरळ वर आणि तिरके

उदा. १२ x १४
१२
१४
(१) प्रथम ४ ने वरच्या २ ला सरळ गुणायचे आणि येणारे उत्तर ८ आडव्या रेघेखाली लिहायचे
१२
१४
----

(२) नंतर दोन तिरके गुणाकार करायचे म्हणजे ४ ने १ ला आणि १ ने २ ला गुणायचे . या दोन्ही गुणाकारांची बेरीज करायची ती आली ४ + २ = ६
१२
१४
----
६:८

(३) नंतर १ ला १ ने सरळ गुणायचे आणि उत्तर १ खाली लिहायचे. म्हणजे उत्तर आले १६८
१२
१४
----
१:६:८
म्हणजेच १२ x १४=१६८
दुसरे उदाहरण
११ x १५
११
१५
१:(५+१):५
१६५
११ x १५ = १६५
वरील दोन्ही उदाहरणात हातचा कोठेच आला नाही . तो जर येत असेल तर तो एक घर डावीकडे आनी खाली असा मांडायचा
उदा. १७ x १३
१७
१३
----
(१) प्रहम ७x३ = २१ यातला १ वरती मांडायचा आणी २ हतचे एक घर डावीकडे खालच्या बाजूस मांडायचे.
(२) आता दोन तिरके गुणाकार ( ३x१ आणि १x७) आणि बेरीज१० यातले ० मांडायचे २ च्या डोक्यावर आणि हातचा १ डावीकडे मांडायचा
१७
१३
----
१०१

----
(३) शेवटी १x१ हे हातचे आलेल्या १ च्या डोक्यावर ( ० च्या डावीकडे) मांडायचे
शेवटी नेहमीप्रमाणे बेरीज करायची
१७
१३
----
१०१
१२
----
२२१
खालील गणिते सोडवा
(१) ७३ x८५ (२) ०९ x९९

तीन अंकी संख्यांचा गुणाकार
पायरी १ - गुणक एकम्‌ x गुण्य एकम्‌
पायरी २ - ( गुणक एकम्‌ x गुण्य दशम्‌ ) + ( गुणक दशम्‌ x गुण्य एकम्‌ )
पायरी ३ - (गुणक एकम्‌ x गुण्य शतम्‌) + ( गुणक दशम्‌ x गुण्य दशम्‌ ) + ( गुणक शतम्‌ x गुण्य एकम्‌ )
पायरी ४ - ( गुणक दशम्‌ x गुण्य शतम्‌) +( गुणक शतम्‌ x गुण्य दशम्‌ )
पायरी ५ - गुणक शतम्‌ x गुण्य शतम्‌
वरील सर्व संख्यांची हातचा घेऊन बेरीज केल्यावर तीन अंकी संख्यांचा गुणाकार मिळतो
उदा. १२६ x३७२
१ २ ६
३ ७ २
--------
पायरी १ - २ x ६ = १२
पायरी २ - २ x २ + ७ x ६= ४+४२=४६
पायरी ३ - २ x १ + ७ x २ + ३ x ६= २+१४+१८=३४
पायरी ४ - ७ x १ +३ x २ =१०
पायरी ५ - ३ x १=३
उदा. १२६ x३७२
१ २ ६
३ ७ २
--------
‌३ ३ ४ ६ २
१ ३ ४ १
----------------
४ ६ ८ ७ २

खालील गणिते सोडवा
(१) २८३x५९२ (२) १४९ x ३७३


याच पद्धतीने चार अंकी संख्यांचा गुणाकार करा.
(१) १२३४ x ५६७८ (२) ३९५९ x १५९९
(३) २५८७ x ३६०१

No comments:

Post a Comment