संगणक क्षेत्रातील हार्डवेअर व सॉफ्टवेअर या दोन्ही क्षेत्रात अफाट वेगाने प्रगती होत आहे. चिप डिझाईनमधील क्रांतीमुळॆ संगणकांचा आकार कमी होत आहे. ते अधिक छोटे, हलके व नेण्याआणण्य़ास वा सोबत बाळगण्यास सोयीचे होत आहेत. साहजिकच डेस्कटॉप कॉम्प्युटरची जागा लॅपटॉप व लॅपटॉपची जागा आयपॅड, टॅबलेट व मोबाईलने घेतली जाऊ लागली आहे.
आज इंटरनेटचा वापर आपण माहिती शोधण्यासाठी वा परस्परांशी इमेलने संपर्क करण्यासाठी वापरतो. व्यवसायासाठी वा जाहिरातीसाठी वेबसाईटचा वापरही मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. मात्र सध्या बहुतेक ठिकाणी स्थानिक कॉम्प्युटरवर चालणारे सॉफ्टवेअर वापरले जाते. त्यासाठी जास्त जागा व्यापणार्या कॉम्प्युटरची खरेदी, त्यावर ऑपरेटिंग सिस्टीम, प्रोग्रॅमिंग लँग्वेजेस व डाटाबेसचे सॉफ्टवेअर स्थापित करावे लागते. त्यानंतर विवक्षित कामासाठी तयार केलेले सॉफ्टवेअर त्यावर चालू शकते.या पद्धतीत संगणक, हार्डडिस्क, इन्हर्टर व इतर सामुग्रीची खरेदी, देखभाल तसेच सॉफ्टवेअर लायसेन्स यांचा खर्च ग्राहकास करावा लागतो. शिवाय अनेक कॉम्प्युटरवर सॉफ्टवेअर चालवायचे असल्यास नेटवर्किंगचा खर्च वाढतो.
आता या सर्व त्रासावर व खर्चिक पद्धतीवर अतिशय सोयीस्कर, विश्वासार्ह व कमी खर्चाचा पर्याय निर्माण झाला आहे. यात माहितीच काय पण संगणक प्रक्रियाही ( प्रोग्रॅम्स) क्लाऊड पद्धतीत विखुरलेल्या स्वरुपात साठवून ठेवणे व कार्यक्षम करणे शक्य झाले आहे. आवश्यक त्यावेळी, आवश्यक ती संगणक प्रणाली वापरावर आधारित खर्च करून आपल्या लॅपटॉप वा मोबाईल सारख्या साधनांद्वारे वापरण्याची सुविधा आता मिळू शकते. माहितीच्या साठ्यावर बंधन नाही, माहितीची पूर्ण सुरक्षितता व वापरातील सहजता यामुळे त्यामुळे थोड्याच काळात स्थानिक सॉफ्टवेअर प्रणाली नामशेष होऊन ऑनलाईन सॉफ्टवेअरचे नवे युग सुरू होणार आहे.
यासाठी महत्वाची गोष्ट म्हणजे कोणतेही स्थानिक वापरासाठीचे सॉफ्टवेअर विकत घेण्याचे टाळावे. असलेली सर्व सॉफ्टवेअर विनाविलंब ऑनलाईन पद्धतीची बनवून ती वेबसाईटच्या द्वारे सर्व्हरवर ठेवून त्याचा वापर करण्यास सुरुवात करावी. नंतर क्लाऊड स्टोअरेज व क्लाऊड प्रोग्रॅमिंगची सेवा दॆणार्या संस्थांच्या साहाय्याने आपली माहिती व संगणक प्रक्रिया सुरक्षित व सक्षम करावी. वेबसाईटबरोबरच मोबाईलवर अप्लिकेशन केल्यास ते अधिक सोयीस्कर ठरू शकते.
नव्या युगाची बदलती पावले ओळखून वेळीच आपण आपल्या संगणक व्यवस्थेत आधुनिकता आणण्याची आवश्यकता आहे.

No comments:
Post a Comment