दिनांक २६ दिसेंबर २०२४ रोजी एका लग्नाच्या निमित्ताने सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात असणा-या कोळगिरे येथील भैरवनाथ मंदिराला भेट देण्याचा योग आला.
विस्तीर्ण परिसरात व नयनरम्य वृक्षवेलींनी सजलेल्या भैरवनाथ मंदीर पाहून मन प्रसन्न झाले. मात्र तेथील परिसरात अस्ताव्यस्त आणि दुर्लक्षित शीलालेख व शंकराच्या भग्न पिंडी पाहून मन व्यथित झाले. सोबत यातील काही भग्न शीलाखंडांचे फोटो दिले आहेत.
या परिसराचे भारतीय पुरातत्व खात्याने सर्वेक्षण करून भग्न अवशेषांचे संरक्षण व पुनर्बांधणी करून देवालयाचे संवर्धन करावे असे वाटते.
- डॉ. सु. वि. रानडे, ज्ञानदीप, सांगली