काल विजयनगरमधील प्रसिद्ध उद्योजक श्री. अरुण म्हसकर यांची मुलाखत घेतली. त्यांनी मला आपल्या आईविषयी लिहिलेली यशोगाथा मला सांगितली. प्रत्येक यशस्वी उद्योगाच्या मागे एक स्त्री असते हे सत्य मला उमगले. मात्र या स्त्रिया स्वतःहून पुढे येत नाहीत त्याना प्रकाशात आणण्याचे काम ज्ञानदीप करणार आहे.
Wednesday, August 17, 2022
बुद्धी, श्रम आणि पैसा
आजच्या जगात बुद्धी आणि श्रम यांच्या रिक्षा पैशाला जास्त महत्त्व आहे मात्र बुद्धी व श्रम यांच्या वापराने पैसा निर्माण होतो त्याची वाटणी मात्र पैशाकडेच जाते. विषमता निर्माण होण्याचे हे एक प्रमुख कारण आहे. यावर एक प्रभावी उपाय ज्ञानदीप सुचवितआहे.
बुद्धी व श्रम हेच संपत्तीचे मोजमाप करायचे. बुद्धी व श्रम यांची बँक निर्माण करून जेवढी बुद्धी बँकेत भराल तेवढी तुम्हाला तेथून घेता येईल. जेवढे श्रम तुम्ही कराल तेवढे तुम्हाला बँकेतर्फे मिळू शकतील.
बुद्धचे व श्रमाचे मापन व दर्जा ठरवणे हेअतिशय क्लिष्ट विषय आहेत. योग्य प्रकारे मूल्यमापन होणे जरुरी आहेट त्सयासाठी सर्वमान्य मूल्यमापन करण्याच्या पद्धती विकसित कराव्या लागतील.
तोपर्यंत जशास तसे या न्यायाने एकाच प्रकारच्या बुद्चीधी व श्रमाची देवघेव करता येऊ शकेल.
Sunday, August 14, 2022
शुभांगीची डायरी ऑक्टोंबर 2003- एक दृष्टिक्षेप.
1 ऑक्टोबर.
आजच्या सकाळ मध्ये सौ. शुभांगी रानडे नावाचा कोणाचा तरी लेख. ओठावर लिपस्टिकऐवजी स्मित लावले तर काही खर्च नपडता कामे लवकर होतात. करतात. लेखांबद्दल अभिनंदन म्हणून एस एम कुलकर्णी काकू आणि रिसबूड काकूंचा फोन पण मी ती मी नव्हेच असे खरे खरे सांगितले.
पण आजपासून एक गोष्ट ठरवली. चार ओळी तरी रोज लिहायच्या.
संध्याकाळी रस्त्याने गर्दीत जायला नको वाटते त्यापेक्षा मागील अंगणात फेऱ्या मारणे बरे दोन दिवसांपासून भांडीवाली -आठ दहा दिवसांसाठी तिची रजा. पोटरीला कसले तरी फोड? तिचे म्हणणे देवीचा कोप.
वर्ड मध्ये कविता 95-100 पूर्ण केल्या काल रात्री बारा सव्वाबारापासून झोप आली नाही म्हणून कवितांचे काम.
2 ऑक्टोबर.
आज मला 55 वर्षे पूर्ण होऊन छप्पन्नावे लागले. सकाळी सकाळीच 6वाजता सौ. गोळे काकूंनी शुभेच्छा म्हणून दोन प्लास्टिकच्या जर्बेराच्या फुलांचा गुच्छ व एक स्वरचित सुंदर कविता दिली. कविता छानच त्यांचे आजी आजोबा, आमचे पण, आमच्या आईचा वगैरे भावांचा उल्लेख. आणि माझ्याशी मैत्रीण वहिनी नव्हे तर बहिणीचे नाते जोडले आहे. सकाळी 9ला सौ. गौरीचा पुण्याहून फोन - शुभेच्छा. दुपारी घरी जेवायला पाकातल्या पुऱ्या. सकाळी 8:00 वाजता सौ. मराठे काकूंचा पण शुभेच्छापर फोन. काल रात्रीच त्या मुंबईहून परत आल्या. गोळे व मराठे यांचेकडे पाकातल्या पु-या दिल्या. संध्याकाळी गावात गणपतीला एकटीच. गोगटे यांचेकडे चष्मा दुरुस्त करून आजींना भेटले. शैलावहिनी पण नंतर भेटल्या त्याना व अश्विनीला रियाला घेऊन नवरात्रात एक दिवस घरी बोलावले. त्यांच्या कोप -यावरच जयंतीच्या सासूबाई सासरे भेटले. तब्येत ठीक. दोघेही नवरात्रात घरी येऊ म्हणाले, दिवे सगळे गेलेले.घरी यायला रात्री नऊ वाजले. सौ. सुमेधाचा व सुशांत, ति. दादा, ती. सौ. ताईचा फोन. शुभेच्छा. केतन पोहणे व बुद्धिबळाच्या क्लासला आठवड्यातून एक दिवस जातो असे कळले. दुपारी 1:00 वाजता सोसायटीतील दिनकर पवार यांच्या नातवाचा वाढदिवस. तिथे जेवण.
3 ऑक्टोबर.
सखदेव भाजी दुकानातून कांदे बटाटे, रताळी, भोपळा, आले,अमितकडून उदबत्ती, गहू, हरबरा, डाळ, तूर, डाळ. देवल सामान किराणा 320. दारावरील उदबत्ती पुडा फ्लॉवर व्हॅली चांगला.
वर्डमध्ये 100 कविता पूर्ण केल्या. साऊंड फाईल करण्याचा प्रयत्न,
4 ऑक्टोबर.
शुभदाचा फोन. मंजिरी भेटली होती. औरंगाबादहून येथे परत. ती सध्या घरी एकटीच. म्हणून तिने बोलावले.तिच्याकडे मंगळवारी जाईन.
5 ऑक्टोबर
बॅंक लॉकरचे काम सकाळी. दुपारी संस्कृत. संस्कृत श्री विभक्ती पूर्ण. संधी. दुरुस्ती सुरू. दुपारी 1:15 सौ. सुब्बाराव यांच्याकडे कॉलेज भिशी. आभाळ पोकळी ही कविता वाचली. गोळे काकूंनीपण त्यांची वाचली. जाता येता आराणके यांची गाडी.
सौ माधवीचे - मुंबई - पत्र. मसाला चांगला झाल्याचे कळवले.सुवर्णपट कविता आवडली. नवरात्रात कदाचित महाड व चेंबूरला एक दिवस. सुशांतचा रात्री फोन कदाचित दसऱ्याला येणार नाही त्याने वेबवरील सर्व कविता वाचल्या. आवडल्या. उद्याच्या नवरात्राची तयारी करणे
6 ऑक्टोबर
भाजी 20 रु. बादली तपेली 25 रु. वीज उद्याची तयारी. रात्री वड्या केल्या.
7 ऑक्टोबर. आज घटस्थापना. पहाटे 2लाच उठले.तक्क्या व खुर्च्यांचे अभ्रे शिवले. झाडझूड, कॉलेजला रजा पोट बरोबर नव्हते.पूजा मीच केली. पुरणपोळ्या सोडून सर्व सर्व स्वयंपाक तयार.पोळ्या सौ. शुभदाने केल्या. जेवणे झाल्यावर उरलेल्या मी केल्या. पुरणात गूळ कमी. ढायबेचीसवाल्यांसाठी का अशी विचारणा झाली. असो.
संध्याकाळी 6:00 वाजता सर्वजण घरी परत गेले गावात. रात्री तुषार गोखलेच्या आईचा फोन. उद्या त्यांच्या महिला मंडळात नवरात्रात मी पाहिलेली अमेरिका यावर भाषण करण्याबद्दल. माझा होकार. 8 ऑक्टोबर
भाषणाची तयारी. मंगळवार,बुधवार, गुरुवार समीर दुपारी 3:15 ते साडेचार घरी येतो. खाणे विश्रांती. मला चारला जायचे असल्याने त्याचे खाणे झाल्यावर गोळेकाकूंना त्याला उठवण्यास सांगितले.
भाषण चार ते साडेपाच पर्यंत चालले. कॅलिफोर्नियाचे फोटो दाखवायला ठेवले.सोसायटी हॉलमध्ये निर्मला कुलकर्णी यांची अपंग पुनर्वसन संस्थेची माहिती सांगितली सांगलीत 1800 अपंग, 10 वर्षे संस्था कार्य 400 अपंगांना उद्योगास प्रवृत्त.त्यांचेही भाषण चांगले झाले.