Sunday, May 25, 2014

सय काव्यसंग्रह गुगलप्लेवर

ज्ञानदीपने गुगल प्लेवर खालील तीन अँड्रॉईड प्रोग्रॅम प्रसिद्ध केले आहेत.
१. ज्ञानदीप फौंडेशन (dnyandeep)
२. ज्ञानदीप इन्फोटेक(dnyandeep_infotech)
३. सय काव्य संग्रह (say_kavyasangrah)
सय काव्यसंग्रहामध्ये ध्वनीफितींचाही समावेश करण्यात आला आहे. गुगल प्ले स्टोअरमध्ये वरील नावाने शोध घेऊन अथवा खालील लिंकवरून डाऊनलोड करून आपल्या स्मार्ट फोन / मोबाईलवर इन्स्टॉल करा व कविता वाचण्याचा व ऎकण्याचा अनुभव घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.dkdineshkhot.say_kavyasangrah

Thursday, May 1, 2014

गुगलप्लेवर ज्ञानदीप

नजिकच्या भविष्यकाळात  आकाश टॅबच्या रुपाने भारतात नवी शैक्षणिक क्रांती होणार आहे व त्या दृष्टीकोनातून ज्ञानदीप गुगल अँड्रॉईडसाठी  प्रोग्रॅम विकसित करणार आहे  असे  ‘आकाशी झेप घे रे’ या नावाच्या लेखात मी लिहिले होते. 
त्या अनुषंगाने अँड्रॉईड प्रोग्रॅमिंगचा अभ्यास करून ज्ञानदीप फौंडेशनच्या सर्व वेबसाईट सहज पाहता येतील अशी सुविधा ज्ञानदीपने ‘गुगल प्ले’ च्या संग्रहात समाविष्ट केली आहे. आपल्या मोबाईलवर ही सुविधा आपल्याला डाऊनलोड करता येईल. यासाठी मोबाईलवरील प्लेस्टोअर उघडून त्यात Dnyandeep या नावाने शोध घेतला की खालील पान उघडेल. ही सुविधा आपल्या मोबाईलवर इन्स्टॉल केली की आपल्याला वापरून पाहता येईल.
अन्यथा कॉम्प्युटरवर खालील चित्रात दिलेली छोटी लिंक वापरून शोध घेतला तरी हे ऍप आपल्याला डाऊनलोड करता येईल.
ज्यांच्याकडे मोबाईल नाही त्यानाही आपल्या कॉम्प्युटरवर ह्या सुविधेचा उपयोग करून पाहणे शक्य आहे. मात्र त्यासाठी अँड्रॉईड डेव्हलपमेंट बंडल डाउनलोड करून एक्लिप्स व अँड्रॉईड sdk मॅनेजर तसेच आभासी मोबाईल डिव्हाईस मॅनेजर avd कार्यान्वित करावे लागतील. असे केल्यावर खाली दाखविल्याप्रमाणे आपल्याला ही सुविधा आपल्या  कॉम्प्युटरवर वापरून पाहता येईल.



  आज अक्षय तृतिया ! या शुभ मुहूर्तावर  अँड्रॉईड व मोबाईल प्रोग्रॅमिंगची मराठीतून माहिती देण्याचा,  तसेच मराठी व संस्कृतमधील शैक्षणिक सुविधा गुगलप्लेवर सर्वांसाठी उपलब्ध करून देण्याचा संकल्प ज्ञानदीप करीत आहे.