Friday, June 26, 2009
घरबांधणीमध्ये सौरऊर्जेचा उपयोग
भारतामध्ये सौरऊर्जा अपार आहे. घरबांधणीमध्ये सौरऊर्जेचा वापर केल्यास वीजेच्या निर्मितीसाठी, पाणी तापविण्यासाठी लागणारी ऊर्जा मिळेलच याशिवाय सूर्यप्रकाशाचा वापर घरातील अंधाऱ्या जागेत उजेड आणण्यासाठी केल्यास विजेची बचत होऊ शकेल. उन्हाळयात पंख्यांना व शीतकाला लागणाऱ्या ऊर्जेसाठी सूर्यप्रकाशाचा उपयोग करता येईल.
सौर ऊर्जेचा वापर करुन घराचे संकल्पन
या प्रकारच्या घरबांधणीमध्ये सूर्यप्रकाशात असणाऱ्या घराचा पृष्ठभाग आवश्यकतेनुसार उघडता व झाकता येण्याची सोय केलेली असते. जाड भिंतीचा उपयोग उष्णता रोधक म्हणून केला जातो. यामुळे घर उन्हाळयात थंड तर हिवाळयात गरम राहते.
छतावर किंवा गच्चीत पाणी साठविण्याची सोय केलेली असते. यामुळे घर दिवसा थंड तर रात्री गरम राहते. सूर्याचा मार्ग घराची योग्य मांडणी उत्तर गोलार्धात दक्षिणेकडील खिडकी हा घरबांधणीमध्ये एक महत्वाचा घटक असतोे. खिडकीच्या काचा तिरक्या बसविलेल्या असल्यास हिवाळयात त्यामुळे उबदारपणा वाढला तरी उन्हाळयात त्यामुळे घरात गरम हवा येते. सरळ उभ्या काचा बंद करणे व पडद्याने झाकणे सोपे असते.
बाहेरच्या बाजूस सावली देणारी झाडे असणे फायदेशीर असते. पडदे, व्हरांडा, उतरते छप्पर यांचीही सूर्यप्रकाश रोखण्याचे उपाय नैसर्गिक वायुवीजनाचा दुहेरी फायदा होतो. त्यामुळे गारवा येतो व घरातील बांधकाम घटकही थंड होतात. नैसर्गिक वाऱ्याची झुळूक आल्यास अंगावरील घामाचे बाष्पीभवन होते व सुखद गारवा वाटतो. केवळ खिडक्या व दारे उघडून नैसर्गिक वायुवीजन साधता येते. विशेषत: उष्ण व दमट हवामानात याचा अधिक फायदा होतो.
प्रकाशाची दिशा बदलून नैसर्गिक सूर्यप्रकाश घरातील आतल्या भागात येईल अशी व्यवस्था केल्यास विजेच्या प्रकाशाची गरज कमी होते व वीजबिलात घट होते. यासाठी आरसे, भिंगे यासारखी विविध प्रकाश उपकरणे वापरून घरात कोठेही नैसर्गिक सूर्यप्रकाश पोहोचविणे आता शक्य झाले आहे. असा सूर्यप्रकाश कमी तपमानाचा व अधिक आल्हाददायक असतोच पण मुख्य म्हणजे यामुळे विजेच्या खर्चात खूपच बचत होते. मोठ्या व्यावसायिक ऑफिसेसमध्ये असा कमी तपमानाचा सूर्यप्रकाश विजेच्या दिव्यांऐवजी वापरल्यास शीतकरणाची गरज कमी होऊन खर्चात बचत होते. सावली असणाऱ्या खिडक्या चे सूर्याच्या उष्णतेपासून संरक्षण करणे व त्याचवेळी घरातील प्रकाशाची गरज भागविण्यासाठी सूर्यप्रकाशाचा जास्तीतजास्त उपयोग करणे हे उद्दीष्ट ठेऊन घराचे डिझाईन करावे लागते. सूर्याच्या उष्णतेने हवा गरम होऊन वर जाते या तत्वाचा वापर करून घराचे डिझाईन केले की नैसर्गिक वायूवीजन होऊन आतील तापमान थंड व सुखकर राहते. घरातल्या फरशीखाली पाणी साठविण्याची सोय केल्यास त्याचीही तापमान थंड ठेवण्यास मदत होते.
इमारतीच्या बाहेरील बाजूच्या भिंती आणि छप्पर वा स्लॅब सूर्याच्या उष्णतेने तापतात व त्याचा परिणाम इमारतीच्या आतल्या तापमानावर होतो. त्यामुळे बाहेरील बाजूस पडवी वा व्हरांडा ठेवल्यास भिंतीवर ऊन पडत नाही. पडदे, उष्णतारोधक काचा यांचा उपयोग करूनही आ येणारी उष्णता थोपविता येते. स्लॅब व बाहेरील भिंतीना प्रकाश परावर्तक पांढरा रंग दिल्यास उष्णता शोषली न जाता ६० ते ७० टक्के उष्णतेचेे परावर्तन होऊन ती परत वातावरणात सोडली जाते व त्यामुळे आतले तापमान थंड राहण्यास मदत होते. अशी उपाय योजना केल्यास घरातील तापमान २ ते ३ डिग्रींनी कमी होऊ शकते. पूर्वी घरांच्या भिंती जाड असत व त्यामुळे आपोआपच उष्णता राखण्यास मदत होत असे. बाहेरच्या खिडक्या व दारे यातून सूर्यप्रकाश सरळ आत येतो व आतील उष्णता वाढते.
खिडकी छतालगत उंचावर असल्यास असा परिणाम अधिकच जाणवतो. यासाठी खिडक्या खालच्या बाजूस ठेवून त्यावर पूर्ण सावली पडेल अशा रीतीने खिडक्या व दारांवरील कनातीची रूंदी ठरवावी लागते. तसेच घराच्या आत येणारा सूर्यप्रकाश सरळ न येता परावर्तित होऊन तो छताकडे जाईल व तेथून सर्वत्र पसरेल अशी योजना करता येते.
भारत उत्तर गोलार्धात असल्याने सूर्याचा मार्ग दक्षिणेकडे झुकलेला असतो. म्हणजेच मध्यान्ही स्थानीय अक्षांशाएवढा सूर्य दक्षिणेकडे कललेला असतो. साहजिकच सूर्यशक्तीवर पाणी गरम करणारी यंत्रणेचे तोंड दक्षिणेकडे असते. मात्र दक्षिणेकडे खिडकी असल्यास जास्त उष्णता घरात येते. यासाठी दक्षिण बाजूस खिडकी न ठेवता ती उत्तरेस ठेवणे योग्य असते.
स्वप्न हरित नगरीचे
वाढत्या औद्यौगीकरणामुळे मोठ्या शहरातील लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. या लोकसंख्येचा ताण शहरातील निवासव्यवस्था, रस्ते, पाणीपुरवठा, वीज यासारख्या पायाभूत सुविधांना सहन करणे अशक्य झाले आहे. शहरातील बहुतेक सर्व मोकळ्या जागा, क्रीडांगणे, बागा व जुन्या इमारती यांच्याजागी नव्या टोलेजंग इमारती उभ्या रहात आहेत.
एका जुन्या एक मजली इमारतीच्या जागी बहुमजली इमारत झाली तेथे राहणाया लोकांची संख्या कित्येक पटीनी वाढते. साहजिकच त्यांची पाण्याची गरज त्याचप्रमाणात वाढते. मात्र पाणीपुरवठ्याचा नळ मोठा करता येत नाही. कारण तो शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेतील एक छोटा भाग असतो. त्यामुळे मोठ्या व्यासाचा नळ बसविला तरी पाणीपुरवठा वाढू शकत नाही. जी गोष्ट पाण्याची तीच सांडपाणी वाहून नेणाया गटारांची वा नळांची. पाणी पुरवठ्यासाठी बोअर वेल, टाकी व पंपाची व्यवस्था करता येते मात्र तयार होणारे सांडपाणी शहराच्या मलजल व्यवस्थेत सोडणे बहुधा शक्य होत नाही. कचरा संकलनाचीही वेगळी व्यवस्था करावी लागते. नव्या इमारतींच्या किंमती अधिक असल्याने त्यात राहणाया लोकांचे जीवनमानही उच्च असते. त्यांच्याकडे स्कूटर व मोटार वाहने असतात. त्यासाठी वाहनतळाची व्यवस्था करावी लागते. रस्त्यावरील वाहतुकही वाढते. रस्ता अधिक रुंद व जास्त टिकावू करावा लागतो. अधिक विजेची गरज भागविण्यासाठी उच्च दाबाच्या तारा व ट्रॅन्स्फ़ार्मर बसवावे लागतात.
एका इमारतीच्या बाबतीत असे होत असेल तर शहरात ठिकठिकाणी अनेक इमारतींचे असे रुपांतर झाल्यास शहराची सर्व सुविधा यंत्राणाच कोलमडून पडते. याशिवाय अनेक जुन्या इमारती पाडण्याचे वा नवीन बांधण्याचे काम चालू असल्याने ट्रकांची वाहतूक, जुने नवे बांधकाम साहित्य व कामगारवस्ती यांचाही ताण शहर व्यवस्थेवर पडतो. शहरातील लोकसंख्या वाढते तशी जीवनावश्यक वस्तूची गरजही वाढते. ती पुरविण्यासाठी मोठी दुकाने, मॉल यांचीही त्यात भर पडते. करमणूक व इतर सुखसोयीही आहे त्या जागेत निर्माण केल्या जातात. परिणामी शहराचे मुळचे रूप नष्ट होऊन त्याला कांक्रीटच्या जंगलाचे रूप येते.
पूर्वीचे खेडेगाव म्हणजे एक रम्य, निसर्गाच्या सान्निध्यात असणारे वसतीस्थान असायचे. गावाच्या प्रवेशद्वाराशी कमान, गावाच्या मध्यभागी एक देऊळ, वड, चिंच वा पिंपळाच्या झाडाखाली असणारा कट्टा, चार गल्ल्या वस्ती, बाजूला एक ओढा, आणि सभोवताली पसरलेली शेती आणि मळे. रस्ते साधेच असले तरी आपले वाटायचे. साध्या दगडा-मातीची वा कुडाची घरेदेखील विलक्षण सुखद असायची. गावातील माणसे, त्यांचे विचार व व्यवहार एका घट्ट विणीत गुंफ़ल्यासारखी एकसंध वाटायची. पारंपारिक जत्रा हे गावाचे आकर्षण असायचे. आता या खेडेगावाचे रूप पार पालटले आहे. शहरी संस्कृतीचे आघात त्यावर झाले आहेत.
पूर्वीचे शहर म्हणजे खेडेगावातल्या लोकांना आकर्षण असायचे. मोठ्या आकर्षक इमारती, रुंद व स्वच्छ रस्ते, बागा, क्रीडांगणे, सरकारी कचेया, वाचनालय व शाळा- कॉलेजच्या देखण्या इमारती, नदी असेल तर रुंद बांधीव घाट, घाटावरील देवळे, सार्वजनिक सभांसाठी खास पटांगणे, एक ना दोन. आठ्वड्याच्या बाजारासाठी वा नाटक- सिनेमा पाह्ण्यासाठी खेडेगावातील लोक शहरात यायचे.
पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंत दिवसाच्या विविध कालखंडांत निसर्ग विविध रुपे धारण करीत असतो. पहाटेचे दंव, उष:कालची लाली, पक्षांचे कूजन, उमलत्या फ़ुलांचे ताटवे, दुपारचे ऊन, संध्याकाळचा गार वारा आणि रात्री आकाशातील नक्षत्रांचा मनमोहक नजारा या गोष्टींना शहरातील माणूस पारखा झाला आहे. या नैसर्गिक सुखकारक गोष्टीऎवजी दूरदर्शनवरील आभासी दृश्यांवर त्याला समाधान मानावे लागत आहे. कृत्रिम वायुवीजन व प्रकाशयोजना तसेच अयोग्य घरबांधणी व अंतर्गत सजावट यामुळे घरातील प्रदूषण्ही वाढले आहे. रस्त्यावरून पायी चालणायाला गर्दी, गोंगाट, प्रदूषित हवा, सांडपाण्याची दलदल, कचयाचे ढीग यातून मार्ग काढावा लागत आहे. तर वाहन वापरणायाला ट्रॅफ़िक जॅम, वेगात चालणारी वाहने व धोकादायक खाचखळग्यांचे रस्ते व पार्कींग समस्यांना सामोरे जावे लागत आहे. वृद्ध व्यक्तींना सुरक्षितपणे हिंडण्यासाठी रस्ते नाहीत. विरंगुळ्यासाठी बागा नाहीत. मुलांना खेळण्यासाठी मोक्ळ्या जागा वा क्रीडांगणे नाहीत.
यावर काहीच उपाय नाही का? सर्वसामान्य माणसाचे सुंदर शहराचे स्वप्न हे स्वप्नच राहणार का? पर्यावरणाची आपण काळजी घेतली व त्या प्रमाणे गृहरचना व शहररचना करण्याचा निश्चय केला तर हे स्वप्नही सत्य ठरू शकेल. आपल्या सुखी जीवनासाठी व आपल्या भावी पिढ्यांसाठी हे अत्यावश्यक आहे.
Domestic KPO for stable and decentralized growth of IT
India, with its large pool of educated employees grabbed this opportunity and emerged as a major service provider in the world. In IT sector, BPO or more correctly KPO ( Knowledge Process Outsourcing) played a significant role in development of corporate companies like Wipro, Infosys, Satyam who gave a real boost to Indian economy by earning sizable foreign exchange through KPO.
These companies recruited large number of software engineers, paid them handsome salary, erected huge infrastructural and info structural facilities and established high quality criteria with strict time management and safeguarding data security essential for undertaking such projects. The companies also could easily collect large share capital through public. The boom in KPO created competition in hiring talent manpower and companies tried to book good students from professional colleges even one or two years before their graduation offering attractive pay packages. This resulted in unprecedented rush to IT and computer courses. As a result new colleges sprung up to meet the need and IT education itself became a most profitable business. Everything was OK till the companies were getting projects.
Unexpectedly, there was a big blow to this lucrative business growth. The collapse of the housing market led to bank collapses in the US and Europe, causing the amount of available credit to be sharply curtailed, resulting in huge liquidity and solvency crises. World giant Lehman Brothers Holdings Inc., a global financial-services firm in US declared bankruptcy in 2008. This triggered crashing of stock market and collapse of many banks and businesses. The previous recession during Mar-Nov 2001 was due to collapse of the dot-com bubble and accounting scandals. The same happened this time also. Recession is not a new phenomenon. Wikipedia lists 11 recessions in US economy during 1945-2007 where the average duration of recession was 10 months. However the present recession started from Dec 2007 and is still continuing.
IT industry in India which was dependent on the service sector outsourcing by these foreign firms had to face sudden decrease in project inflow for which they were not prepared. Corporate India’s other debacle was confession by Chairman of the $2-billion Satyam Computer Services of misleading financial statements to the tune of Rs 7,136 crore, including Rs 5,040 crore of non-existent cash and bank balances. This raised doubts about the reliability of published financial statements of other IT firms also. Satyam fraud put a question mark on the entire corporate governance system in India
Unfortunately the growth of IT industry in India has been concentrated in urban centres with few big corporates occupying major share. The small scale IT industries are mainly engaged in education and meeting the local software needs. Their share in BPO is negligible. This is mainly due to nonexposure to the global market and inability to meet the criteria for acquiring BPO projects. The major drawback is low capital, non availability of talented workforce due to its migration to big IT corporates. The projects handled by small IT firms are of short duration, customized to suit local market and not of international acceptable quality. It never-the-less a huge store of IT manpower and must be converted into valuable sustainable resource by financial inputs, training and upgrading their product quality.
The big corporate IT firms in India, who need economy and flexibility in operations should help building this resource by outsourcing tiny subunits or modules of their projects to small IT firms located in semi-urban and rural area. This will help in reducing their skilled manpower requirements and providing them ample resource availability at less cost. However, these firms who were mainly providing services to foreign businesses will have to develop effective methods to get the services managed through remote small scale IT firms. Thus they will have to act as middle link between small scale IT firms and foreign industries offering large scale projects. In absence of foreign projects, these IT corporate can concentrate on large scale domestic project requirements.
Fortunately, there is a great scope for IT industry in India. The major sectors which are witnessing a special thrust for adoption of IT are e-Governance initiatives by Govt. and semi-government agencies, Insurance, Banks, Energy, Financial Institutions, Defense, Public Tax System,. In industry also ERP implementations and systems integration continue to be at the forefront of IT growth in India.
All these large IT projects requiring huge financial input and requiring long time span for completion are generally beyond the reach of small firms due to financial requirements and incapability of planning and coordination of such projects. Big corporate firms can easily arrange for necessary finance, meet the software and hardware infrastructure requirements and can wait for long period to get returns. These firms should use BPO techniques for allocating the project sub-modules to small firms. This will not only give stability to their business, but would help in decentralized and sustainable growth of IT sector in India.
A large section of women are now employed in various IT companies located in urban area. Generally family is nuclear with no elder nonworking persons in the house. In IT companies, employees have to work 10/12 hours and often at odd hours daily. If the company is far away from residence, travel time required adds to this period. It becomes difficult for women to manage both service and home front after marriage. Once the have kids, problem increase as home workload increases and it becomes difficult for women to take care of the kids personally. This results in increasing psychological tension in addition physical hardship of service. It is observed that many women leave the service at the peak of their career. Not doing the job or leaving the job creates a sense of frustration in educated women. Thus a vast resource of talented workforce remains unutilized. There is need to devise methods for tapping this resource without hampering the hormonius family relations.
Fortunately advances in communication technology have created facility of working at home. With high speed secure internet messenger services the office work can be remotely from house. If proper infrastructural and software facilities are used, the work can be outsourced easily to individuals. Proper coordination and detailed organization work flow can be developed to have effective domestic level BPO. This will be economical for the employing industries and convenient to women. Unemployed youth and those who have lost jobs due to recession can also be given job at reduced rates.
Facility of working remotely will be more beneficial to small firms and people located in rural and semi urban area. This will usher a new era of overall growth of region without burden on urban centres and would avoid mass migration of talent from rural area.Educational institutes, women and unemployed youth, small software firms and large IT corporate would for a stable chain to meet human resource requirements.
Small software firms in India are mostly engaged in educationactivity or are meeting the needs of customized software for local clientale. They have low capital, often no licensed software or proper hardware and workforce who is transitory waiting for joining big firms.This situation will have to be changed if they have to play a role of producing high quality software needed for oversea’s projects. The big IT companies should take up this challenge by investing in strengthening these small firms instead of building costly infrastructure in urban centres.
The IT personnel, working in big IT companies and drawing handsome salary should realize uncertainty of job and should spend money not in unproductive items like purchase of real estates, or share market but should lend helping hand to unemployed youth, form small group and start own business. May be, they would get less returns, but they will create a place, where they can keep working if job is lost. The biography’s of may industrial stalwarts and milliners show that they have taken such risks in their early career in spite of odds and other tempting offers.
Dnyandeep Education & Research Foundation has a vision of developing such network. Dnyandeep Infotech Pvt. Ltd., main sponsor organization of foundation has successfully completed many small scale foreign projects even with high attrition rate of trained employees. Dnyandeep Foundation has close links with many educational institutes in Maharashtra and has started work in this direction by signing MoU with these institutes, motivating the teachers and individual free lance workers to participate in this novel experiment.
No doubt, the task of building quality conscious and capable small independent centres and train them to meet basic requirements of BPO projects like data security, quality, work efficiency and strict time management is enormous and capital intensive. But it is the need of the hour and IT industries or government should do allout efforts to build it.
If big corporate IT firms take a lead in this project, significant progress can be made in disseminating benefits of BPO to grassroot level human resource without their relocation. I had made similar comment on Nandan Nilekani’s views on strengthening urban centres in his talk on www.ted.com.
I hope IT people now working in big firms will think over on this topic and express their views.
Thursday, June 25, 2009
आयटी उद्योगाचे विकेंद्रीकरण आवश्यक
परदेशातून काम करून घेतले तर त्याला ऑफशोअर आउटसोर्सिंग म्हणतात तर माहिती तंत्रज्ञानातील कामे बाहेरून करून घेतली तर त्याला नॉलेज प्रोसेस आउटसोर्सिंग ( केपीओ) म्हणतात.
भारताचे परदेशातील कंपन्यांकडून आयटी क्षेत्रातील बीपीओमार्फत मिळालेले उत्पन्न २००७ मध्ये १० बिलियन डॉलर होते. हे जगातील आयटी क्षेत्रातील बीपीओ व्यापाराच्या ६३ टक्के होते. मात्र याआधीच्या वर्षी हेच ७० टक्के होते. ७ टक्क्यांची ही घट पूर्व युरोप, फिलिपाईन्स, मोरोक्को,इजिप्त आणि दक्षिण आफ्रिका यांच्याकडे वाढलेल्या बीपीओमुळे आहे हे लक्षात घेतले पाहिजे. चीननेही या व्यवसायात पदार्पण केले असून त्याचा येथील व्यवसायावर प्रतिकूल परिणाम होणार आहे.
आज भारतात इंजिनिअरिंग उद्योगांमध्ये सुट्या भागांच्या उत्पादनाचे काम छोट्या उद्योगांकडून करून घेतले जाते. बहुतेक सर्व मोठॆ उद्योग बीपीओचा वापर करून आपल्या कामाचे विकेंद्रीकरण करतात. महाराष्ट्रात ग्रामीण भागात असणार्या औद्योगिक वसाहतीतील व एमआयडीसीतील बरेचसे उद्योग अशा सुट्या भागांच्या निर्मितीवर आधारलेले आहेत. उद्योगाची व त्याद्वारे राज्याची सर्वांगीण प्रगती होण्यासाठी अशा बीपीओची फार गरज असते.
सध्या भारतात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील मोठ्या कंपन्या जागतिक मंदीमुळे अडचणीत आल्या आहेत. आतापर्यंत परदेशातून बीपीओच्या माध्यमातून मोठे प्रकल्प व प्रचंड पैसा मिळत असल्याने भरपूर पगार देऊन आयटी क्षेत्रातील पदवीधारकांची भली मोठी फौज आपल्या पदरी ठेवून या कंपन्यांनी बलाढ्य साम्राज्ये उभी केली व सर्व अर्थ व्यवस्थेला चांगली गती दिली. मात्र जागतिक मंदीमुळे ऑफशोअर आउटसोर्सिंग करणार्या देशातील उद्योग बंद पडून बेरोजगारी वाढल्याने त्यांना असे प्रकल्प मिळणे कमी झाले व त्याचा फटका भारतातील आयटी कंपन्यांना बसला. खर्चात काटकसर करायची तर पगार कपात वा नोकरकपात करावी लागणार. मात्र या उद्योगांचे शेअर भांडवल जनतेतील जनतेतील उद्योगाविषयी असणार्या प्रतिमेवर अवलंबून असल्याने काटकसरीचे उपाय न करता तोटा होत असूनही तो दडविण्याकडे व ‘सर्व आलबेल आहे’ असे दर्शविण्याचे प्रयत्न सुरू झाले. परदेशातील ‘ल्हेमन ब्रदर्स’ काय व इथले ‘सत्यम कॉम्पुटर्स’ काय, दोन्हीकडे असे बलाढ्य उद्योग बंद पडले. आज भारतात सुस्थितीत दिसत असणार्या उद्योगांची खरी स्थिती काय आहे हे त्यांच्याशिवाय इतर कोणालाच माहीत नाही. मात्र नवीन नोकरभरतीत झालेली घट परिस्थिती बिकट असल्याचे दर्शविते.
यावर उपाय हा बीपीओच ठरू शकतो. या कंपन्यांनी आपले बहुतेक काम ग्रामीण व निमशहरी भागातील छोट्या कंपन्यांना आउटसोर्स केले तर बीपीओचे वर वर्णन केलेले सर्व फायदे या कंपन्यांना मिळू शकतील. निम्याहून कमी खर्चात प्रकल्प पूर्ण करता येतीलच याशिवाय सर्वात महत्वाचे म्हणजे ग्रामीण व निमशहरी भागातील छोट्या संगणक कंपन्यांना नवसंजीवनी मिळून अनेक सुशिक्षित संगणक तज्ज्ञांना आपल्या गावीच काम मिळेल. त्या भागाचा विकास होईल. शहरीकरण व त्यातून येणारी महागाई व प्रदूषण टळेल.
आतापर्यंत या आयटी कंपन्यांनी केवळ सेवा व मनुष्यबळ देण्याचे काम केले त्यांना आता सेवा व मनुष्यबळ छोट्या कंपन्यांकडून घेण्याचीही भूमिका पार पाडावी लागेल. याबाबतीत बीपीओविषयी छोट्या कंपन्यांना प्रशिक्षित करणे, त्यांना भांडवल पुरवणे, शैक्षणिक संस्थांमधून पदवी घेऊन बाहेर पडणार्या विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण व त्यांचा मानसिक कल बदलणे ही कामे करावी लागणार आहेत. परदेशातील उद्योगांना भारतात काम देताना जी ‘माहितीची गुप्तता राखणे’, ‘कामाचा दर्जा उत्तम ठेवणे’, ‘वेळेचे गणित पाळणे’ व ‘विश्वासार्हता’ या गोष्टींची काळजी वाटते तशीच काळजी भारतातील मोठ्या उद्योगांना वाटणे स्वाभाविक आहे. अशा उत्तम दर्जाच्या छोट्या संस्था तयार करणे हेही एक मोठे आव्हान आहे ते मोठ्या उद्योगांनी पेलायला हवे. ज्ञानदीप फौंडेशनच्या मते भारतातील शिक्षणसंस्था, छोटे उद्योग, मॊठे उद्योग अशी परस्परपूरक व परस्परावलंबी साखळी तयार करता आली तर या संगणक उद्योगाचा चिरस्थायी व विकेंद्रित विकास होऊ शकेल.
आयटी क्षेत्राच्या विकासात महिला पार मोठे योगदान देऊ शकतात. आजही मोठया आयटी कंपन्यांत महिलाची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र त्यांना पुरुषांप्रमाणे दररोज १०/१२ तास काम करावे लागते व घरातील जबाबदार्या सांभाळाव्या लागतात त्यामुळे त्यांना मानसिक व शारिरिक त्रास सहन करावा लागतो व लग्नानंतर तर परिस्थिती अधिकच बिकट .होते अनेक महिला नोकरी सोडतात. नोकरी न केल्यामुळे व आपल्या शिक्षणाचा काही उपयोग करता येत नाही अशा विचाराने निराश होणार्या अशा महिलांना काम देण्याची काहीतरी व्यवस्था करणे आवश्यक आहे. सुदैवाने माहिती तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे घरी बसून ऑफिसमधील काम करण्याची सोय उपलब्ध झाली आहे. मोठ्या कंपन्यांनी अशा महिलांना अर्धवेळ वा घरी राहून काम करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली तर महिलांचे फार मोठे मनुष्यबळ या कंपन्यांना कमी पगारात उपलब्ध होऊ शकेल. महिला सशक्तीकरणालाही यामुळे चालना मिळेल. आपल्या कुटुंबाला हातभार लावल्याचे समाधान महिलांना मिळेल.
मंदीमुळे नोकरी न मिळालेल्या वा नोकरी गमवावी लागलेल्या संगणकतज्ज्ञांचा मोठा वर्ग निर्माण झाला आहे. महिलांचा व या कुशल मनुष्यबळाचा उपयोग छोट्या कपन्यांना करून घेता येईल. यासाठी बीपीओच्या कार्यपद्धतीचा सर्वांनी अभ्यास करणे व वापर करणे आवश्यक आहे.
ज्ञानदीप फौंडेशनशी संलग्न असणार्या ज्ञानदीप इन्फोटेक प्रा. लि. कंपनीने परदेशातील अनेक प्रकल्प बीपीओतर्फे यशस्वीरीत्या पूर्ण केले आहेत. ज्ञानदीपचा अनेक शिक्षण संस्थांशीही निकटचा संबंध आहे. बीपीओचे महत्व लक्षात घेऊन ज्ञानदीप फौंडेशनने याबाबतीत जनजागृती करण्याचे ठरविले आहे. सर्व शिक्षण संस्था, महिला व घरी संगणकावरील काम करण्याची असणार्यांसाठी दूरस्थ शिक्षणाद्वारे प्रशिक्षण वर्ग घेण्याचाही विचार आहे. परदेशात राहणार्या संगणकतज्ज्ञांनाही यात सामावून घेता येईल. आपल्या या बाबतीत काही सूचना असतील तर संपर्क साधावा.
Friday, June 19, 2009
सिलिकॉन व्हॅली ग्रेटस् - पुस्तक परिचय
सिलिकॉन व्हॅली ग्रेटस् - पुस्तक परिचय
लेखक - एस. एस. क्षत्रिय
विकास पब्लिशिंग हाउस प्रा. लि.
आय. टी. क्षेत्रात नाव मिळविलेल्या यशस्वी उद्योजकांचे फोटो व माहिती असणारे ‘सिलिकॉन व्हॅली ग्रेटस्’ हे पुस्तक बंगलोरला फोरममध्ये पाहिले. कुतुहलाने पुस्तक चाळले तेव्हा त्यात बंगलोर व सिलिकॉन व्हॅली यांची तुलना केलेली व दोन्ही ठिकाणच्या आय. टी. उद्योजकांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेऊन माहिती लिहिलेली आढळली.
मी सिलिकॉन व्हॅलीमध्ये नुकताच जाऊन आलो होतो. तेथील वैभव पाहून माझे डॊळे दिपून गेले होते. सिलिकॉन व्हॅलीला हे वैभव मिळवून दॆण्यात भारतीयांचा महत्वाचा वाटा आहे हे ऎकल्याने मी मनोमन सुखावलो होतो. टेक म्युझियममध्ये ‘सुहास पाटील’ हे नाव कोरलेले पाहिल्यावर माझी छाती अभिमानाने भरून आली होती. आय. टी. उद्योगाची पंढरी असणार्या स्टॅन्फोर्ड युनिव्हर्सिटीला भेट दिल्यावर तर मी भक्तीभावाने तेथील दगडगोटे सिलिकॉन चिप मानून घरी घेऊन आलो होतो. भारतात परतल्यानंतर आमच्या ज्ञानदीपच्या भावी संगणक तज्ञांना त्यातील एक एक दगड देऊन तो देवात ठेवण्यास सांगितले होते व तुम्ही सर्वांनी सिलिकॉन व्हॅलीत जाऊन यश मिळवायची खूणगाठ बांधा असे सुचविले होते. साहजिकच ‘सिलिकॉन व्हॅली’ हे नाव वाचताच मी ते पुस्तक विकत घेतले.
अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीवर असणार्या कॅलिफोर्निया राज्यातील सॅन फ्रॅन्सिस्को ते सॅन ओसे पर्यंतच्या दहा मैल रुंदीच्या व ३० मैल लांबीचा प्रदेशास ‘सिलिकॉन व्हॅली’ असे म्हणतात. तेथे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात ज्या गतीने प्रगती झाली व नव्या कंपन्या उदयास आल्या, त्याचीच पुनरावृत्ती भारतात बंगलोरमध्ये पहावयास मिळाली. त्यामुळे लेखकाने बंगलोरला भारतातील सिलिकॉन व्हॅली म्हटले आहे. पुस्तकाच्या प्रस्तावनेत सिलिकॉन व्हॅली व बंगलोरविषयी माहिती व भारतीयांच्या सिलिकॉन व्हॅलीमधील वास्तव्य व टेक्नॉलॉजीमधील प्रगतीचा आढावा घेण्यात आला आहे व मुख्य भागात नऊ उद्योजकांची माहिती देण्यात आली आहे. त्याचा थोडक्यात सारांश.
१. चंद्रशेखर - चैन्नईजवळच्या कुंभकोरम या गावी मध्यमवर्गीय कुटुंबात १९६० मध्ये कि. बा. चंद्रशेखर यांचा जन्म झाला. इंजिनिअरिंगच्या प्रवेशपरिक्षेत यश न मिळाल्याने त्यांनी बीएससीत प्रवेश घेतला. विद्यापिठात तिसरा क्रमांक मिळवून त्यांनी आपल्या बुद्धीची चमक दाखवली व मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधून त्यांनी इलेक्ट्रॉनिक्समध्ये डिप्लोमा मिळविला. सात वर्षे विप्रोत नोकरी केल्यानंतर त्यांनी १९९० मध्ये अमेरिकेतील रोल्टा कंपनी जॉईन केली. १९९२ मध्ये आपल्या घरातच स्वतःची फोरेस नावाची कंपनी काढली. त्यांची पत्नी सुकन्या हिने त्यात मदत केली. पुढे याच कंपनीचे एक्झोडस हे नामांतर झाले. अमेरिकेतील प्रोजेक्ट मिळवून भारतातील त्यांच्या मित्रांनी बंगलोरमध्ये स्थापन केलेल्या कंपनीमार्फत काम करुन घेऊन त्यांनी आपल्या व्यवसायाचा व्याप वाढवला. ऎक्झोडस ही कंपनी १९९८ मध्ये पब्लिक लिमिटेड झाली. टीआयई या भारतातील आय टी उद्योजकांना मदत करणार्या संस्थेचे कंवल रेखी यांनी २००,००० डॉलरची मदत केली. यातूनच जॅमक्रॅकर या सॉफ्टवेअर कंपनीची इ. स. २००० मध्ये स्थापना केली व त्यासाठी १०० दशलक्ष डॉलरचे भांडवल मिळविले. नंतर त्यांनी e4e नावाची नव्या उद्योगांना भांडवल पुरविणारी कंपनी स्थापन केली.
२. बी. व्ही जगदीश - जगदीश यांनी १९७८ मध्य् बी. ई. इलेक्ट्रिकल व १९८० मध्ये व्हीजेटीआयमधून एमटेक केले व महिना १२०० रु. ची नोकरी पत्करली. दोन मुलांसह आठ बाय आठ फुटांच्या एका खोलीत त्यांनी दोन वर्षे संसार केला. टाटा एलेक्सी व नंतर सिंगापूर मध्ये नोव्हेल कंपनीत त्यांनी नोकरी केली. अमेरिकेतील कंपन्यांशी संपर्क वाढवून व चंद्रशेखरांच्या एक्झोडसमध्ये जॉईन होऊन त्यांनी आपल्या उद्योगाचा जम बसविला. नेटमॅजिक, नेट स्केलर या डाटा सेंटर कंपन्या तसेच आयस्टेशन नावाची मेल सर्व्हीस देणारी कंपनी काढली.
३. कंवल रेखी - स्वातंत्र्यप्राप्तीपूर्वी रावळपिंडी येथे जन्म झालेले कंवल रेखी कानपुरात विस्थापित म्हणून रहायला आले. १९६३ मध्ये बीएससी व आय. आय टी, मुंबईला १९६८ मध्ये बी टेक. करून मिशिगन युनिव्हर्सिटीत एमएस केले. १९७० मध्ये आर.सी.ए कंपनीत नोकरी सुरू केली. १९७१ मध्ये त्यांना ले ऑफ मिळाला. ४-५ वर्षे स्वयंशिक्षण व व्यवसाय केल्यानंतर झीलॉग कंपनीत ३० टक्के पगार कपात असणारी नोकरी मिळाली. इंदरनील व सुभाष बाल यांच्या मदतीने एक्सेलॉन या कंपनीची १९८२ मध्ये स्थापना. १९८९ मध्ये ही कंपनी नोव्हेलने २१० दशलक्ष डॉलरला विकत घेतली व नोव्हेल कंपनीत ते अधिकारी बनले. १९९४ मध्ये त्यांनी टीआयईची स्थापना केली. एक्झोडसमध्ये पैसे गुंतवले व नव्या उद्योजकांना प्रोत्साहन दिले.
४. नरेन बक्षी - १९६३ मध्ये बिटसमध्ये बी ई व अमेरिकेत एमएस व एमबीए केले. हिंदुथान मोटर्स व स्टॅन्डर्ड ऑईल कंपनीत नोकरी केल्यानंतर अमेरी ट्रस्ट बॅंकेत उपाध्यक्ष झाले. १९७९ मध्ये टीआरडब्ल्यू कंपनीत संचालक. व्हर्साटा व व्हिजन सॉफ्टवेअर कंपन्यांची स्थापना. इ. स १९९८ मध्ये केवळ एक दशलक्ष भांडवल असणार्या व्हर्साटा कंपनीला इ. स. २००० मध्ये १०० दशलक्ष भांडवल शेअरमधून मिळाले. राजस्थान आयटी उद्योजकांसाठी RITEG संस्थेची स्थापना. त्यांची पत्नी कुसुम हिने अमेरिकेत RANA राजस्थानी असोसिएशन स्थापन केली. जैन मंदिरे व असोसिएशनच्या कामात आता व्यस्त.
५. प्रदीप कार - १९८१ मध्ये नागपूरमधून बीई. १९८३ मध्ये एमबीए. विप्रोत एक वर्ष नोकरी. १९८४ मध्ये कॉम्प्युटर पॉईंट, मुंबई, बंगलोर व दिल्ली येथे. शिवा कॉंप्युटर्सची स्थापना. नंतर सोनाटा सॉफ्टवेअर कंपनीत अधिकारी म्हणून अमेरिकेत नोकरी. १९८८ मध्ये परत भारतात. १९८९ मध्ये मायक्रोलॅंड कंपनीची स्थापना. नोव्हेलचे भारतातील एज्युकेशन सेंटर म्हणून मायक्रोलॅंडचे काम. १९९२ मध्ये कॉंम्पॅक कॉंप्युटर्सची स्थापना. सिनॉप्टिक व सिस्कोशी संबंध. इंडिया डॉट कॉम, ITspace.com व media2india.net वेबसाईटची निर्मिती.
६. राज सिंह - १९६८ मध्ये बीई, १९७० मध्ये आय आय टी दिल्लीत पीजी डिप्लोमा, १९८१ मध्ये मिनेसोटा युनिव्हर्सिटीत एमएस. नौदलात आयएनएस विक्रांतवर नोकरी. डिजिटल डिझाईन व व्हेरीलॉग वर पुस्तक प्रसिद्ध. InterHDL, Fiberlane Communications, Cerrent, Siara कंपन्यांची स्थापना. भांडवल पुरवठा करणार्या संस्थात भागीदारी.
७. सबीर भाटीया - बीएस व एमएस. अँपल कॉंप्युटर्स व नंतर फायर पॉवर सिस्टीम मध्ये नोकरी. फायर पॉवर सिस्टीममध्ये नव्या RISC प्रोसेसर असणार्या पॉवरपीसी चिपवर आधारित कॉंप्युटरची निर्मिती. १९९५ मध्ये जावासॉफ्ट कंपनीची स्थापना. DFJ कंपनीकडून १५ टक्के भागीदारीच्या मोबदल्यात ३ लाख डॉलरचे भांडवल मिळविले. १९९६ मध्ये HOTMAIL ची निर्मिती. एका वर्षात ५ दशलक्ष सभासद व दररोज ३०००० सभासदांची भर. मायक्रोसॉफ्ट ने हॉटमेल ४०० दशलक्ष डॉलरला विकत घेतले. आरजू वेबसाईटची निर्मिती परंतु पुरेसा प्रतिसाद न मिळाल्याने साईट बंद केली. टेलेव्हॉईस कंपनीत सध्या उपाध्यक्ष म्हणून कार्यरत.
८. उमंग गुप्ता - आय.आय.टी. कानपूर मधून १९७१ मध्ये बी. टेक., १९७२ मध्ये अमेरिकेत एमबीए. व कॉपर फील्ड, ओहिओ येथे नोकरी. १९७३ मध्ये आयबीएममध्ये रुजू. भारतात आयबीएम मार्केटींग मॅनेजर म्हणून सहा महिने काम. मॅग्नसन कॉंप्युटर्समध्ये नोकरी. सिस्टीम आर विकसित केले. १९८४ मध्ये एसक्यूएल डाटाबेसवर आधारित प्रणालीसाठी गुप्ता टेक्नॉलॉजीजची स्थापना. गुप्ता टेक्नॉलॉजीजचे सेंचुरा सॉफ्टवेअर म्हणून नामांतर. कीनॊट सिस्टीम्समध्ये गुंतवणूक. नेटलॉक कंपनीचे अध्यक्ष.
९. एन. आर. नारायण मूर्ती - १९६७ मध्ये म्हैसूर् येथे बीई. १९६९ मध्ये आय.आय.टी. कानपूर मधून एम. टेक., सेसा या फ़्रेंच कंपनीत नोकरी. सिस्टीम रिसर्च इन्स्टिट्यूट, पुणे येथे दोन वर्षे नोकरी. १९७७ मध्ये पटनी कॉंप्युटर्समध्ये रुजू. केवळ २५० डॉलर भांडवलावर १९८१ मध्ये इन्फोसिसची स्थापना. अमेरिका व फ़्रॉन्समधील कंपन्यांशी करार. १९८७ मध्ये बोस्टन येथे इन्फोसिसची शाखा. १९९३ मध्ये पब्लिक कंपनी म्हणून नोंदणी. १९९६ मध्ये ब्रिटन व १९९७ मध्ये जपानमध्ये शाखा. इ. स. १९९९ मध्ये नॅसडॉक स्टॉक एक्स्चेंजवर नोंदणी.
वरील सर्व उद्योजकांची चरित्रे वाचल्यावर मला पहिल्याप्रथम हे जाणवले की ही सर्व माणसे मध्यम वर्गातून पुढे आली आहेत. सर्वसामान्य मुलांप्रमाणे त्यांच्याही आयुष्यात अपयश, निराशा व नोकरीतील अशाश्वतता व हाल अपेष्टा आल्या होत्या. पण या सर्वांवर मात करून केवळ चिकाटी, दुर्दम्य आत्मविश्वास व उच्च ध्येय गाठण्यासाठी लागणारी कष्ट करण्याची तयारी या गुणांवर त्यांनी दैदीप्यमान यश मिळविले आहे. आपल्याकडे बर्याच वेळा एकदा अपयश आले की मुले निराश होऊन प्रयत्न सोडतात. त्यांच्यासाठी चिकाटी व धाडस असले की कशी प्रगती साधता येते हे या उद्योजकांनी दाखवून दिले आहे.
आजच्या मंदीच्या व बेरोजगारीच्या काळात वरील उद्योजकांची चरित्रे निश्चितच विद्यार्थ्यांना मार्गदर्शक व नवी प्रेरणा देणारी ठरतील. आय. टी. उद्योजकांच्या प्रत्यक्ष मुलाखतीवर पुस्तक लिहून लेखकाने नव्या पिढीसाठी अनमोल खजिना खुला केला आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन.