Friday, May 31, 2013

XML ( एक्सएमएल) भाग -३


 वेबसाईट डिझाईनमध्ये आपण html म्हणजे Hyper Text markup Language  वापरतो त्याची रचनाही xml  सारखीच असते मात्र त्यातील टॅग ठराविक असतात. xml मध्ये टॅगचे नाव आपण काहीही ठेऊ शकतो. यात टॅगचा उपयोग फक्त माहिती चा प्रारंभ व शेवट दाखविणे एवढाच असतो.  मात्र जर आपण वेबडिझाईनच्या टेबलमधील टॅग  वापरून xml लिहिली तर नावांच्या साधर्म्यामुळे घोटाळा होण्याची शक्यता असते  समजा एका अशा xml मध्ये table टॅग दोन प्रकारची माहिती लिहिण्यासाठी वापरला असेल तर नावांच्या साधर्म्यामुळे चूक होईल. अशावेळी टॅगचे नाव पूर्वप्रत्यय (prefix) वापरून बदलले जाते.


--------------------------
चुकीची रचना
<table>
 <tr>
    <td>Apples</td>
    <td>10</td>
    </tr>
</table>
 <table>
    <name>Window</td>
    <width>1.5</td>
    <height>2.5</td>
 </table>
---------------------------------
बदललेले सुधारित स्वरूप
<a:table>
 <a:tr>
    <a:td>Apples</a:td>
    <a:td>10</a:td>
    </a:tr>
</a:table>
 <b:table>
    <b:name>Board</b:name>
    <b:width>1.5</b:width>
    <b:height>2.5</b:height>
 </b:table>
----------------------------

XML Namespaces - The xmlns Attribute

 वरील xml फाईलमध्ये   Table हा टॅग एकदा html table मधील माहिती लिहिण्यासाठी तर दुसर्‍यावेळी साधा xml tag  म्हणून वापरला आहे. टॅगच्या नामसाधर्म्यामुळे होणारी चूक टाळण्यासाठी prefix लावून हा दोष काढला आहे. मात्र  html  माहिती व दुसरी माहिती  यातील फरक कळण्यासाठी xml टॅगच्या xmlns या गुणविशेषाचा वापर केला जातो. xmlns म्हणजे xml namespace सुरुवातीच्या टॅग मध्ये माहितीच्या प्रकाराविषयी माहिती दिली जाते. 
<a:table xmlns:a="http://www.w3.org/TR/html4/">
 <a:tr>
    <a:td>Apples</a:td>
    <a:td>10</a:td>
    </a:tr>
</a:table>
 <b:table xmlns:b="http://www.w3schools.com/board">
    <b:name>Board</b:name>
    <b:width>1.5</b:width>
    <b:height>2.5</b:height>
 </b:table>

No comments:

Post a Comment