Thursday, February 23, 2017

Green Tech 2017, Pune Seminar Report

A short duration seminar on GreenTech 2017 was arranged by Dnyandeep Foundation, Sangli  on 18 Feb. 2017 at MTE Society  campus in Pune for promoting sustainable development through education and research in Green Technology.

The seminar was conducted under the chairmanship of Dr. M. G. Deomane.

Prof. Prafulla Kulkarni welcomed the delegates and explained the need of such get together of environmental engineers and green architects for collaborative effort.

Dr. S. V. Ranade informed that Dnyandeep Foundation has launched a comprehensive environmental portal website www.envis.org to provide all related knowledge resources. It would also serve as  a platform for interaction and association to develop ecofriendly technology solutions and effective project management.


Shri. Santosh Tandale described the advantages of using rooftop solar pv systems with connection to  MSEDC grid and getting reduction in electric billing by net metering.

Shri. Omkar Pethakar highlighted advantages of digital marketing and showed how it achieves goal of green  marketing by reducing energy and material consumption.

Shri. Shridhar Tandale illustrated technical journal search utility developed by Dnyandeep for Indian Water Works Association which has provided access to research and development work  done in India since last 50 years.

Prof. Tirthkar of CME, Pune explained the working of  Suspended Bed Reactor technology for sewage treatment and informed how SBR system  adopted by PCMC has reduced land requirement for treatment.

Prof. S. G. Kanitkar, Secretary of MTES explained the need of research in use of renewable energy resources and assured all help to Dnyandeep Foundation for conducting joint research and development projects  in Green Technology as well as Information Technology.

The seminar was attended by Dnyandeep Infotech team, past students of Walchand College of Engineering, Sangli and teaching staff of College of Hospital Management.

Saturday, February 18, 2017

ऊर्जा आणि ऊर्जेची साधने

ऊर्जा म्हणजेच जीवन. या संबंध विश्वाचा कारभार ज्या मुलभूत घटकांवर आधारित आहे. त्यातील एक घटक म्हणजे ऊर्जा. ऊर्जा  म्हणजे कार्य करण्याची क्षमता. जीवनक्रम अव्याहत चालू ठेवण्याचे कार्य उर्जा करते. कोणत्याहि कार्यासाठी आणि ऊर्जा निर्मितीसाठी इंधन आवश्यक असते. शरिराला लागणाऱ्या ऊर्जेचे इंधन म्हणजे अन्न. ऊर्जा निर्मिसाठी लागणारे इंधन म्हणजे दगडी कोळसा, लाकूड, खनिज तेल, वायू आणि वीज म्हणजेच मनुष्य प्राणी आणि वनस्पती यांचे पोषणासाठी तसेच उष्णता व प्रकाश निर्माण करण्यासाठी आणि यंत्रे चालविण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता आहे.

    प्राचीन काळापासून लाकुड हाच मानवाचा एकमेव उर्जास्त्रोत होता. अगदी सतराव्या शतकापर्यंत लाकुडच वापरले जायचे. सतराव्या शतकात वेगवेगळे ऊर्जास्त्रोत सापडले. हे ऊर्जास्त्रोत म्हणजे दगडी कोळसा आणि पेट्नेलियम यांचा ऊर्जा पुरविण्याची शक्ति लाकडापेक्षा प्रचंड असल्यामुळे त्यांचा वापर यंत्रामध्ये केला गेला. आणि पुढील ३ शतकांत मानवी संस्कृतीने प्रगतीचा मार्ग प्रचंड वेगाने कापला. एकोणीसाव्या शतमांत मोठमोठी जनित्रे निर्माण झाली. विद्युत शक्तिने तर जगाचे स्वरूपच पालटून टाक ले. विद्युत शक्तीवर चालणारी हजारो नवी उपकरणे, यंत्रे तयार झाली. आज घरातील बरीचशी कामे विजेच्या सहाय्याने होतात. आज कोळसा हा रेल्वे इंजिन आणि आगबोटीत वापरला जातो. रस्त्यावरील लहान मोठी वाहने ही खनिज पेट्नेलियम पासून शुध्द केलेल्या पेट्नेल, डिझेलवर चालतात. पण आज हे ऊर्जास्त्रोत संपुष्टात येण्याच्या मार्गवर आहेत. अतिशय जंगलतोडीने जगातील मोठमोठी जंगले नष्ट झाली आहेत, आणि त्यातून प्रदूषणाची दुसरी समस्या उभी राहिली आहे.

ऊर्जेचे प्रकार -

१.    अन्न ऊर्जा - मनुष्याला व प्राण्यांना अन्नाच्या रूपाने ऊर्जा लागते. वनस्पती सूर्यप्रकाश आणि कार्बनडाय-ऑक्साईड यापासून उर्जा निर्माण करतात.

२.    इंधन ऊर्जा - प्रकाश व उष्णता निर्माण करण्यासाठी आणि यंत्रे चालविण्यासाठी लागणाऱ्या ऊर्जेला इंधन ऊर्जा म्हणतात.

अ)    पुननिर्मिती न करता येणारे ऊर्जा प्रकार - खनिज तेल, दगडी कोळसा, फर्नेस तेल, केरोसिन, वायू इंधन (एल. पी. जी. वायू)

आ) पुननिर्मित होणारी ऊर्जा प्रकारे - जलप्रपात, वारा, सौर उर्जा, भू औष्णिक ऊर्जा.

ऊर्जा साधने

सध्याच्या इंधन समस्येवर तोडगा काढणे ही काळाची गरज आहे. परंतु शास्त्रज्ञांनी इंधन समस्या येणार असे ओळखून यापूर्वीच बऱ्याच वर्षापासून त्यावर तोडगा काढायला सुरूवात केली आहे. परवाच्या इराक-अमेरिका युध्दाच्या वेळी खनिज तेलाची टंचाई भासली. त्यातुन दरवाढ झाली. अशीच परिास्थिती १९७३ च्या अरब इस्त्राईलच्या युध्दाचे वेळी झाली होती. सध्या अजून ४०० विहीरी पेटलेल्या अवस्थेत आहेत. अजून त्यातून खनिज इंधन नाश पावत चालले आहे.

आतापर्यंत फक्त खनिज तेल वापरूनच ऊर्जा निर्मिती करता येते असा समज होता. परंतु आता शास्त्रज्ञांनी बऱ्याच पर्यायी ऊर्जाप्रणाली पुढे आणल्या आहेत. यात वायुजन्य ऊर्जा, सौर ऊर्जा, लाटांपासून ऊर्जा निर्मिती, सागरी प्रवाहांतील तपमानाच्या फरकाचा फायदा घेऊन ऊर्जा निर्मिती, भु-औष्णिक ऊर्जा असे अनेक पर्याय आहेत. परंतु या सर्व ऊर्जाप्रणालीवर निर्सगाचे नियंत्रण चालते. आणि मानवी इच्छेवर निसर्ग चालत नाही. त्यामुळे यापासून आपल्या ऊर्जेच्या गरजा भागवता येणे अशक्य आहे.

रासायनिक ऊर्जा निर्मिती व आण्विक ऊर्जा निर्मिती प्रक्रिया या दोनच मानवी हुकमाखाली राहू शकणाऱ्या ऊर्जानिर्मिती पध्दती आहेत. पण या पध्दती खर्चीक आणि धोकादायकही आहेत. अशा परिस्थितीत शास्त्रज्ञांना दोनच आशेचे मार्ग आहेत. एक म्हणजे हायड्नेजनचा इंधन म्हणून वापर करणे आणि दुसरा मार्ग म्हणजे अणु (साधन) संघटन किंवा फ्यूजन. परंतु हे ऊर्जास्त्रोत प्रचलीत होण्यासाठी अजून बरेच संशोधन करावे लागणार आहे. खनिज इंधनाव्यतिरिक्त सध्या प्रचलित असणारे ऊर्जाप्रकार पुढे संक्षिप्तपणे सांगितले आहेत.

१.    जलशक्ति -


जलशक्तिचा वापर मानव अश्मयुगापासून करीत आहे. ``नीचचक्र'' या पध्दतीमध्ये पाती किंवा दाते असलेले चक्र पाण्याच्या प्रवाहात किंचीतसं बुडेल असे बनविले जाते. पाण्याच्या वेगामुळे पात्यांना गती मिळते व पर्यायाने चक्र फिरू लागते. परंतु यातून मिळणाऱ्या शक्ति पाण्याच्या प्रवाहाच्या वेगावर अवलंबून असते. याउलट ``उच्चक्र'' या पद्धतीत पाण्याच्या पातळीखाली चक्र बसविण्यात येते. आणि पात्याऐवजी पन्हाळी मिळणारी शक्ति पाण्याच्या वेगावर अवलंबून असते. प्रचंड धारणालगत बसवलेल्या अजस्त्र आकाराच्या पाणचक्या विद्युत निर्मितीसाठी वापरल्या जातात.

२.    पवन ऊर्जा -

खनिज स्वरूपाच्या ऊर्जेवर पर्याय शोधताना साहजिकच आपले लक्ष न संपणाऱ्या ऊर्जासाधनांकडे जाते. पवनऊर्जा हे एक असेच साधन आहे. पृथ्वीवरील वातावरणातील हवेच्या हालचालीमुळे आपल्याला पवन ऊर्जा मिळते. शिडांची जहाजे चालविणे, पवनचक्की व्दारे पाणी उपसणे आणि पिठाची जाती चालविणे अशासारखी पवन ऊर्जेचे उपयोग प्रचलित होते. आधुनिक तंत्रज्ञान वापरून पवनचक्कीव्दारें मोठ्या प्रमाणात वीज निर्मिती करणे आता शक्य झाले आहे.

पवनऊर्जा वाऱ्याच्या वेगावर अवलंबून असते. व तिची क्षमता वेगाच्या धन प्रमाणात वाढते. साधारणपणे सागरी किनारपट्टी व डोंगराळ प्रदेशात वाऱ्याचा वेग चांगला असतो. पवन जनित्राव्दारे वीज निर्मिती करण्यासाठी १५ कि.मी. पेक्षा अधिक वेगाचे वारे लागते. ते अशा ठिकाणी सहज मिळते. पाणी उपसण्यासाठी १० कि. मी. पेक्षा अधिक वेगाने वाहणारे वारे लागते. अशा ठिकाणी शोधून तिथे पवनचक्या लावता येतात.
भारताच्या अपारंपारिक ऊर्जास्त्रोत विभागाने भारतामध्ये पवनमळे उभारले आहेत. महाराष्ट्नत देवगड येथील पवनमळयात १० पवनजनित्रे १९८६ साली उभारली आहेत. आणि त्यातून मिळणारी विज महाराष्ट्न् विद्युत मंडळाच्या ग्रीडमध्ये दिली जाते.

पवनजनित्रामध्ये मुख्यत्वे पवनचक्की, मुख्य कणा, गीअर पेठी, जनित्र, ब्रेकची व्यवस्था, पवनचक्की वाऱ्याच्या दिशेला फिरण्याची व्यवस्था व कंट्नेल व्यवस्था हे मुख्य भाग आहेत.
देवगड येथील पवनमळयात १० पवनजनित्रे ३ रांगामध्ये बसवली आहेत. दोन जनित्रांमध्ये किमान पवनचक्कीच्या व्यासाच्या चौपट इतके अंतर ठेवावे लागते. ही रचना वाऱ्याच्या दिशेवर अवलंबून आहे. याची विद्युत क्षमता ५५० किलोवॅट इतकी आहे आणि वर्षाला सुमारे ८ ते १० लाख युनिट इतकी वीज निर्मीती यातून होते.

पवनमळे उभे करण्यासाठी खालील गोष्टी लक्षात घेतल्या जातात.
१)    वाऱ्याचा वेग चांगला असावा व शक्यतो हा वेग वार्षिक सरासरी ताशी १५ कि. मी. पेक्षा अधिक असावा.
२)    जागा मोकळी व मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असावी. झाडी कमीत कमी असावी.
३)    जवळच ग्रीडची उपलब्धता असावी.
४)    पवनजनित्रे व ती उभारण्यासाठी लागणारी यंक्षसामुग्री नेण्यासाठी रस्त्याची सोय असावी.

३. सौर ऊर्जा -

    ऊर्जा समस्येवर उत्तम उपाय म्हणजे सौर ऊर्जा होय. कारण आतापर्यन्त वापरात असलेले स्त्रोत हे कायम रहाणार नाहीत. सौर ऊर्जा ही प्रचंड प्रमाणात पृथ्वीवर येते. यातील बरीचशी वाया जाते. अजूनतरी कोठे सौरशक्तिकेंद्र उभारण्यात आलेले नाही. शिवाय अशा प्रकारचे केंद्र उभारून मोठ्या प्रमाणात सौर ऊर्जा विद्युत ऊर्जेत रूपांतरीत करण्याचे उपायही माहित नाहीत. त्यामुळे सूर्य शक्तिचा वापर हा सौरकुट, सौरभट्टी, सोलरहिटर यांच्या साधनांच्या सहाय्याने अल्पप्रमाणात केला जातो. याचे कारण म्हणजे सौर उपकरणांसाठी भांडवली खर्च जादा लागतो. वीज, तेल, कोळसा, या ऊर्जा त्यामानाने स्वस्त आहेत. परंतु सध्या प्रत्येक राष्ट्नची विजेची गरज ही फारच वाढली आहे. आणि इतर ऊर्जा पदार्थांची मुबलकता कमी झाली आहे. त्यामुळे सौर ऊर्जाच्या पर्यायावर सर्व राष्ट्नंचा भर आहे. सौरऊर्जेच्या उपयोगाची आधुनिक उपकरणे पुढीलप्रमाणे आहेत. पेटीचा कुकर, सौरभट्टी, पाणी गरम करण्याचा प्लॅट, प्लेट कलेक्टर, गरम हवेचा कलेक्टर, शेतीचे पदार्थ वाळविण्यासाठी ड्नयर, खाऱ्यापाण्यापासून गोडेपाणी करणारा सोलर स्टील, उबदार राहणारे सौर घट, हिट पंप अशा अनेक प्रकारची सौर ऊर्जा उपकरणे विकसित झाली आहेत.

    परदेशामध्ये पॉवर प्लॅट, सूर्य विजेवर चालणारे फ्रिज, सूर्यवीज केंद्रे इत्यादी वापरात आले आहेत. भारतामध्ये सुूध्दा आधुनिक तंत्राच्या सहाय्याने सूर्यशक्तिचे प्रकल्प अनेक ठिकाणी सुरू आहेत. भोर-नाशीक भागातील रस्त्यावरील दिवे सूर्य विजेवर चालतात. धुळे जिल्ह्यात ३२० एम. डब्ल्यू. सूर्य वीज प्रकल्प १९८५ मध्ये सुरू झाला आहे. तामीळनाडूत सूर्यवीजेवर रेल्वे सिग्नल, तिरूपती-बंगळूर-विशाखापट्टणम येथे इंटरलॉक पध्दती, ग्रामीण पंपासाठी, सूर्य विजेचा वापर दिल्लीजवळ मसुदपूर खेड्यात प्रत्येक घरात स्वयंपाक, दिवे, पाण्याचे पंप, टी. व्ही. रेडिओ हे सर्व सूर्यविजेवर चालतात. अपंगाच्या सायकलीसाठी सूर्य ऊर्जा वापरली जाते.

    सध्याच्या विज्ञानयुगात प्रगत तंत्रज्ञानासाठी लागणारीवीज अंतराळात मोठ्या प्रमाणात निर्मिती करून तिचा वापर केला जातो. त्याचप्रमाणे अंटार्क्टिका मोहिमेसाठी उपग्रहाच्या रिमोट कंट्नेलसाठी, रडार यंत्रणा इत्यादी ठिकाणी सूर्य विजेचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.

४. भू- औष्णिक ऊर्जा -
   
    भू-औष्णिक ऊर्जा ही वारा अथवा ऊन यासारखी उपलब्ध नसते. ज्या ठिकाणी भूगर्भातील उष्णता मिळवता येते अशा ठिकाणाहून ती मिळवून त्याचा वापर ऊर्जा निर्मितीसाठी करता येते. भूपृष्ठाखाली जसजसें खोल जावे तसतसे अंदाजे तपमान वाढते. जिथे खडक वितळलेल्या अवस्थेत असतात तेथे हे तापमान अंदाजे ११००० सें. इतके असते. भूपृष्ठावर सुध्दा बऱ्याच ठिकाणी उष्ण बिंदू आहेत. या उष्ण बिंदूचे तापमान ९०० सें. ते ४५०० सें. पर्यन्त असते. ही उष्णता खडकांच्या खाचात असणाऱ्या पाण्यात किंवा वाफेच्या स्वरूपात साठविलेली असते. ती बाहेर काढण्यासाठी अशा ठिकाणी कुपनलिका खोदतात. आणि नलिका उष्णबिंदूजवळ पोचल्या की तिथे अडकून पडलेले गरम पाणी व वाफ या नळयांवाटे भूपृष्ठावर उसळी मारते. भूगर्भातील अंतर्गत हालचालीमुळे अथवा ज्वालामुखींच्या उद्रेकांमुळे असे उष्ण बिंदू तयार होतात. या उष्णतेचा वापर करून इटाली, आईसलंड, न्यूझीलंड, जपान  व रशियात ऊर्जा निर्मिती करणारी केंद्रे कित्येक वर्षे अस्तित्वात आहेत. आईसलंड येथील ४०% जनता भूऔष्णिक उर्जेने उबदार केलेल्या घरातून रहाते.

भारतात अनेक ठिकाणी गरमपाण्याचे झरे आहेत. यांचा आपण भूऔष्णिक ऊर्जेसाठी वापर करून घ्यायला काहीच हरकत नाही.
    अमेरिकेतील ``द गिझर्स'' या ठिकाणी भुऔष्णिक ऊर्जेचे दोन निरनिराळे साठे आहेत. यातून प्रचंड प्रमाणात बाहेर पडणाऱ्या वाफेच्या सहाय्याने जनित्र फिरवून विद्युत निर्मिती केली जाते.

५. जैविक ऊर्जा -
   
    पुननिर्मित होणाऱ्या ऊर्जेचे सर्वात महत्त्वाचे साधन म्हणजे जैविक ऊर्जा. या ऊर्जेची साधने चार गटात विभागता येतील. घन, वायू, द्रव आणि सजीव ऊर्जा. जैविक ऊर्जा ही सहजरित्या वा मुबलक मिळू शकते.

अ) घन ऊर्जा - लाकूड-जंगलापासून मुख्यता लाकूड मिळते. हे लाकूड उष्णता निर्मितीसाठी बऱ्यचा ठिकाणी वापरले जाते. खेड्यांमध्ये स्वयंपाकासाठी लाकूड सर्रास वापरले जाते. तसेच कारखान्यांमधील बॉयलर्समध्ये इंधन म्हणून लाकूडच वापरतात. लाकूड हे भारताचे आद्य इंधन आहे.

    कोळसा (लोणारी) -  लाकडापासून हा कोळसा तयार करतात. याच्या ज्वलनामध्ये धूर होत नाही. हा कोळसा स्वयंपाकासाठी वापरला जातो.

    शेण - गुरांचे शेण हा एक इंधन प्रकार खेड्यातील लोक शेणाच्या गोवऱ्या करून इंधन म्हणून वापरतात.

    कचरा- औद्यौगिक, शहरी आणि शेतातील कचरा ऊर्जेची भूक भागवण्यास मदत करतात. कचऱ्यापासून ऊर्जा निर्मितीच्या एकूण चार पध्दती आहेत. खांस भट्ट्यांतून कचरा जाळून त्या उष्णतेचा वापर करणे, ऊर्जा भट्ट्यांमधून पूरक इंधन म्हणून वापर करणे, कचऱ्याचे विघटनात्मक शुध्दिकरण करणे, इतर मार्गांनी ऊर्जा निर्मिती प्रणालीत कचरा वापरणे. बऱ्याच ठिकाणी कचऱ्यापासून कचरा वीट बनवली जाते. आणि या विटा इंधन म्हणून वापरतात.

ब) वायु इंधने - बायोगॅस -शेण, शेतीमालाचा टाकाऊ भाग आणि काही औद्योगिक कारखान्यातील सांडपाणी यांपासून गोबर गॅस अथवा बायोगॅस तयार करतात. हे इंधन आता ग्रामीण भागात फारच लोकप्रिय होत चालले आहे. डिस्टीलरीपासून बाहेर पडणाऱ्या मळीपासून तयार होणारा बायोगॅस बॉयलरमध्ये पूरक इंधन म्हणून वापरला. यामुळे खनिज इंधनाची बचत होते.
   
    लाकडापासून वायू इंधन - लाकडाचे रूपांतर वायू-इंधनात करण्याचे उपकरण मिळते. या इंधनाचा उपयोग स्वयंपाकासाठी तसेच इंजिने, जनित्रे व बॉयर्ल्स चालविण्यासाठी करतात.

क) द्रव इंधने - वनस्पतीपासून मिळणारी तेले, इंधन म्हणून वापरली जातात. आणि अशी तेले खनिज तेलांना पर्याय ठरू शकतात. तसेच अल्कोहोलसारखी द्रव्ये सुध्दा इंधन म्हणून वापरता येतात.
ड) सजीव ऊर्जा - प्राण्यांच्या शक्तिचा वापर करून विहिरीतून पाणी बाहेर काढणे, शेतीची अवजारे ओढणे, शेतीची कामे करणे, किंवा अवजड वस्तू उचलणे इत्यादी कामे केली जातात. यासाठी बैल, उंट, गाढव, घोडे व हत्ती यासारख्या प्राण्यांच्या बळाचा वापर केला जातो. पूर्वीच्या काळापासून प्राणी बळाचा उपयोग वाहतूकीसाठी केला जातो. भारतातील खेड्यात प्राणीबळच प्रमुख ऊर्जेचे स्त्रोत आहे.

६. इतर पर्यायी ऊर्जा

हायड्रोजन -
हायड्रोजन हे खनिज तेलापेक्षा चांगले आहे. ऊर्जा निर्मितीच्या बाबतीत हायड्नेजन सर्वात कार्यक्षम इंधन ठरते. पेट्नेल दर लिटरमध्ये ४२००० बि. टी. यु. एवढी उष्णता निर्माण करते तर द्रव हायड्रोजन दर लिटरला १,३४,५०० परवडत नसल्यामुळे हायड्नेजन हे प्रचलित साधने होऊ शकत नाही.

संघटन ऊर्जा / विघटन ऊर्जा - संघटन प्रक्रिया ही विघटन प्रक्रियेच्याअगदी उलट टोकाची आहे. या दोन्ही प्रक्रियेमध्ये अणूच्या केंद्राना एकत्रित बांधणारी ऊर्जा मुक्त करून वापरली जाते. एवढेच साम्य आहे. संघटनात हलक्या मूलद्रव्यांची केंद्रे एकमेकांत मिसळून एकत्रित करण्यात येतात. तर विघटनात जड मूलद्रव्यांची मोठी केंद्रे फोडून ऊर्जा मुक्त करण्यात येते. अशा अणुभट्ट्यांतून निघणाऱ्या उष्णतेवर पाण्याची वाफ तयार केली जाते आणि त्यावर जनित्र चालवून वीज निर्माण केली जाते.
   
    खनिज इंधनांव्यतिरिक्त इतर ऊर्जा साधनांचा वापर करण्याचे तंत्रज्ञान विकसित केल्यास भविष्यकाळात ऊर्जेची चिंता राहणार नाही.

Friday, February 17, 2017

Transperancy through election

Digital revolution has provided multiple tools of investigating the past history of candidates. The political parties are using these techniques to expose the misdeeds of opposing candidates. The media is too happy to give this information to public as Breaking News. As a result, the people now know all true facts about the candidates. Still, the decision of  of selecting the candidate is influenced by many other factors and such revelation of character may not  have much impact on election.

But the biggest advantage of such exposure of wrong doings, wealth collection by unfair means, involvement in corrupt practices, violence or conspiracy by the candidates is transparency  rendered to their past history. They cannot correct or defend the activities done in past.Though at present, they might have become law abiding and honest and feel sorry for their past deeds, they can't escape from law.

This effect of election to force transparency on the past history may be inconvenient to many candidates in all parties, but it has one positive impact for future elections.

Now those aspiring to join political party and stand for election have to take care of their behavior, guard their prestige and refrain from misdeeds. They should speak with responsibility and do not change their policies and opinions. They should think that they are under constant surveillance and should build their history with clean, accountable and justifiable actions. Otherwise bad history will destroy your aspirations and dreams.

If such change occurs, we shall get good candidates in future and it will be the greatest gift of election induced transparency to our society.

Monday, February 13, 2017

झोपडपट्टी - समाज बहिष्कृत वसाहत

जवळ जवळ पंचाहत्तरी गाठलेल्या माझ्या आयुष्यात प्रथमच मी एका झोपडपट्टीचे जवळून दर्शन घेतले आणि दुर्लक्षित व हलाखीत जगणार्‍या लोकांना पाहून मला आपल्या समाजजीवनातील एका सर्वात मोठ्या व्यंगाची व व्यथेची जाणीव झाली.  स्वातंत्र्यानंतर इतकी वर्षे उलटून गेल्यानंतरही  झोपडपट्टीची ही समस्या दूर न होता मोठ्या झपाट्याने मोठ्या तसेच लहान शहरातही वाढत आहे व इतर सर्व समाजाकडून त्याकडे अक्षम्य व सोयीस्कर दुर्लक्ष्य होत आहे या कल्पनेने मन विषण्ण झाले. याच समाजाचा मी एक भाग होतो आणि आतापर्यंतच्या माझ्या जीवनप्रवासात अगदी वैचारिक पातळीवरही मी कधी या समस्येला महत्व दिले नाही याचे वाईट वाटले. या क्षेत्रात समर्पित भावनेने काम करणार्‍या व महिला नेतृत्व असणार्‍या शेल्टर असोसिएटसने  नकळत माझे लक्ष या समस्येकडे वेधले याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे.



झोपडपट्टी म्हणजे काय हे मला लहानपणापासूनच माहीत होते.  पूर्वीच्या काळचे संत महात्मे, आचार्य विनोबा, महात्मा गांधी, ज्योतिबा फुले, मदर तेरेसा व अशा अनेक समाजसुधारकांचे दलित उद्धाराचे कार्य अगदी भक्तीभावाने मी वाचले होते. तरीदेखील प्रत्यक्ष झोपडपट्टीत जाऊन आपण असे काही कार्य करावे असे वाटले नाही. याचे कारण मी एका सुरक्षित, एकसंध पण स्वयंकेंद्रित अशा मध्यमवर्गीय समाजव्यवस्थेचा एक भाग होतो. आमच्या जीवनातील समस्या सोडवण्यात आणि आशाआकांक्षा पुर्‍या करण्याच्या धडपडीत आम्ही इतके गुरफटून गेलो होतो की आमच्या मदतीची गरज असणार्‍या या समाजाचा आम्हाला विसर पडला होता.

वृत्तपत्रे, कथा, साहित्य व इतर प्र्सारमाध्यमे यांच्याद्वारे झोपडपट्टीतील अस्वच्छता, रोगराई, दारिद्र्य, व्यसनाधीनता, गुन्हेगारी व गुंडगिरी या विषयी खरी, खोटी तसेच बर्‍याच वेळा अतिरंजित माहिती कानावर पडत असते. त्यामुळे सर्वसामान्य माणूस शक्यतो अशा वस्तीत जायला धजावत नाही. अशा झोपडपट्टीतील लोकच आपल्या घरात व बाजारात आपल्या संपर्कात येत असले तरी त्यांच्या वस्तीबद्दल आपल्याला फारच कमी माहिती असते. म्हणजे आपणच ती माहिती घेण्याचे टाळतो.  साहजिकच आपल्याला अशा झोपडपट्टीबद्दल एक अनामिक भीती वाटत असते.

नोकरी धंद्याच्या निमित्ताने ग्रामीण भागातील अनेक लोक आपली घरे दारे सोडून शहराच्या आश्रयाला येतात. शहरात त्यांना काम मिळाले तरी राहण्यासाठी जागा नसते. जागा विकत वा भाड्याने घेण्याइतकी त्यांची ऎपतही नसते. मग असे लोक सरकारी वा मोकळ्या जागांवर झोपड्या बांधून राहू लागतात. मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरात बहुतेक टोलेजंग आणि आकर्षक इमारतींना अशा झोपडपट्टीचा वेढा पडलेला असतो. कारण इमारतीतील लोकांच्या निवासी सेवा पुरविणार्‍या गरीब कर्मचार्‍यांना राहण्याची काहीच सोय नसल्याने भोवतालच्या मोकळ्या जागांवरच झोपड्या बांधून ते राहतात.  जागा कमी व वस्ती अधिक असल्याने एकमेकांना चिकटून आणि अगदी कमी रुंदीचा रस्ता ठेवून या झोपड्या बांधलेल्या असतात. अशा अनाधिकृत जागांवरील झोपड्यांना महापालिकेकडून रस्ते, पाणी, ड्रेनेज या सुविधा देण्यात अडचणी येतात.  साहजिकच कचरा, सांडपाणी,अस्वच्छता वाढून  अशा झोपडपट्टीत रोगराईचा प्रसार होतो.

  झोपडपट्टीतील लोकांचे  जीवन सुधारले नाही तर त्याचा आपल्या सर्व समाजालाच  धोका निर्माण होऊ शकतो. हे आपण समजून घेतले पाहिजे. झोपडापट्टी निर्मूलनाच्या व त्याजागी स्वत:ची घरे बाधून देण्याच्या अनेक महत्वाच्या योजना सरकारने सुरू केल्या आहेत पण त्यांच्या अंमलबजावणीत अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे नजिकच्या भविष्यकाळात तरी आपल्याला आहे त्या झोपडपट्ट्यांचे आपल्या नजिकचे अस्तित्व स्वीकारावे लागेल. काही ठिकाणी शहर सौंदर्याच्या कल्पनेतून झोपडपट्ट्या दिसू नयेत यासाठी भिंत बांधलेली आढळते. पण त्यामुळे दृष्टीआड सृष्टी झाली तरी तेथील प्रदूषण, रोगराई, गुन्हेगारी यांचा त्रास सार्‍या समाजाला व परिसराला भोगावा लागतो हे विसरून चालणार नाही. आपण त्यांच्यापासून फटकून वागलो तरी त्यांचा सहवास टाळणे आपल्याला अशक्य आहे. आपली मुले, महिला यांची सुरक्षितता वा आरोग्य धोक्यात येऊ शकते.    शिवाय तेथे राहणारीही आपल्यासारखीच माणसे आहेत. त्यांनाही लहान मुले, महिला, संसार आहे. त्यांना दिवसरात्र अशा समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.  याचा समाजधुरिणांनी गांभिर्याने विचार करावयास हवा. शिक्षण, आरोग्य, मूलभूत सेवासुविधा देऊन त्यांचे जीवन सुसह्य केले तर सार्‍या समाजालाच त्याचा फायदा होईल.

स्मार्ट व इकोफ्रेंडली नव्या शहरांची उभारणी करताना वा असलेल्या शहरांत विकास प्रकल्प राबविताना सर्वप्रथम झोपडपट्टीवासियांच्या पुनर्वसनाचा प्रश्न प्राधान्याने सोडवणे गरजेचे आहे. अन्यथा समाजातील दरी अधिक रुंदावेल आणि सारे समाजस्वास्थ्यच धोक्यात येईल.

Sunday, February 12, 2017

Tributes to Data Visualisation Master Professor Rosling

A professor of global health at Sweden's Karolinska Institute, Professor Rosling has died at the age of 68.  He developed Gapminder,a  data visualization tool, which allows users to convert statistical data into easily understandable visual display.

He presented his work at TED talk show in 2006 and explained the trends in population growth, child survival rate, GDP and personal income levels in different countries.

Bill Gates paid tribute to Professor Rosling on Twitter.
"A great friend, educator and true inspiration for our work. Melinda and I are saddened by the loss of Hans Rosling," said the philanthropist, who has said one of the main reasons behind his decision to donate billions of dollars to healthcare projects in the developing world was down to a Rosling presentation on the issue.( Ref: Telegraph News /)

I give below the video of his famous speech and pay my tributes to a great personality who used his computer knowledge for creating awareness about global scenario in public health.


Thursday, February 9, 2017

Individual toilet scheme for slum area - Shelter initiative

Shelter Associates is a Non Government Organization (NGO) working in Maharashtra, India.  It provides technical support for community-managed slum rehabilitation housing and essential services projects.The organization with main office in Pune  is managed by Architects, social workers and technical staff.

They have successfully completed slum sanitation projects in Pune, Sangli, Miraj and at present are engaged in individual toilet project for low income group houses in  Vichare Mala at Kolhapur.

I came to know about Shelter Associates last year when their technical staff approached me regarding some difficulties in septic tank construction at Miraj scheme. Septic tank provides only partial treatment to human waste and works under anaerobic conditions. If the inlet and outlet pipes do not have Tee pipes or if the vent pipe is not provided, smell nuisance becomes problem. If there is leakage in tank construction,  it may cause ground water pollution. I gave some guidelines for proper septic tank design at that time.

Recently they called me to visit Vichare mala at Kolhapur and advise on the septic tank installations in individual one room houses. I found that the houses in the colony have very narrow roads with open gutters on both sides. Due to hard rock at shallow depth, there was difficulty in providing septic tank below each toilet. All houses have small one room space within which these toilets are being constructed. 

I suggested to change the design of septic tank such that enough space for waste storage can be achieved. Proper Tee pipes at inlet and outlet and vent pipe with mettle screen at top end to prevent mosquito breeding.  were some suggestions. But the biggest problem, I observed was that the septic tank effluent is discharged in open gutter. This septic waste water along with solid waste dumped by residents was clogging the gutters at many places and were creating grave sanitation problem. These gutters were transporting solid waste along with septic tank effluent to open nallas finally taking the waste load  to river. 

A thought came to my mind that central underground drainage instead of open gutters and individual septic tanks would have become more economical and environmentally safe alternative. Even community toilets with biogas plants could become better suited if sufficient space can be procured. This will reduce the cost of individual toilets and would not hamper the usable space in such one room houses.
Shelter Associates should work out alternative cost effective and environmentally acceptable projects to address slum sanitation problems.